“जय श्रीराम” पॅनेलचा एकतर्फी विजय

0

 

पश्चिम नागपुर नागरीक संघ, रामनगर, नागपुरच्या बहुचर्चीत निवडणुकीत “जय श्रीराम” पॅनेलचा एकतर्फी विजय.

आपल्या कार्यकतृत्वाने नागपुरातील धार्मिक, अध्यात्मीक सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा ऊमटवणा-या पश्चिम नागपुर नागरीक संघाच्या पंचवार्षिक निवडणुका हा बराच चर्चेचा विषय होता.
जय श्रीराम पॅनेलचे सर्वच्या सर्व २५ ऊमेदवार बहुमताने निवडुन आले. या विजया बद्दल त्यांनी प्रभुरामरायाचे आशिर्वाद व रामभक्तांच्या मतदानरुपी शुभेच्छांचा आवर्जुन ऊल्लेख केला आहे.

या विजयात अध्यक्ष रवि वाघमारे, कार्यवाह राजीव काळेले व ईतर सर्व जेष्ठ श्रेष्ठ विश्वस्तांचा सिंहाचा वाटा आहे.
आजच्या फक्त स्वतःचा नावलौकीक वाढवण्याच्या काळातही सर्व २५ नवनिर्वाचीत विश्वस्तांनी येणारे रामनवरात्र, हनुमानजन्मोत्सव आदी थाटात साजरा करण्याकरता एकमताने जुनीच कार्यकारीणी पुढेही काम पाहील असा ठराव मांडणे निश्चीतच कौतुकास्पद व अनुकरणीय आहे.

नवनिर्वाचीत अध्यक्ष रवि वाघमारे, कार्यवाह राजीव काळेले, कोषाध्यक्ष विनोद जोशी, ऊपाध्यक्ष मिलींद वझलवार, अशोक पात्रीकर, सहसचिव अजय डबीर, अॅड. राहुल पुराणीक, सहकोषाध्यक्ष श्रीराम सावरकर,अशोक गुजरकर.
विश्वस्त सभाभद : बाबासाहेब देशपांडे, जयंत आपटे, श्रीधर पात्रीकर, डाॅ. दिपक खिरवडकर, दिलीप धोटे, चंद्रशेखर घुशे, अनीरुद्ध पालकर, मृणाल पुराणीक, वृषाली शिलेदार, मुकुंद सरमुकद्दम, मुकुंद महाजन, किरण देशपुजारी, अनील हस्तक, अशोक आग्रे, अशोक केदार, दत्तात्रय खरे.