आरक्षणाच्या निर्णयाचा सकल मराठा समाजाकडून जल्लोष

0

 

(Buldhana)बुलढाणा – (Manoj Jarange Patil)मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात समस्त मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विजयाचा खामगाव येथील छत्रपती शिवाजी

महाराज चौकात मराठा समाज बांधवांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला. मराठा आरक्षणा संदर्भात कायदा तयार करून अध्यादेश काढला आहे व त्याचे तसे राजपत्र सुद्धा तयार करून खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः जरांगे पाटलांच्या हातात देऊन या आंदोलनाची सांगता करण्यात आली.

अनेक वर्षाच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला यश आले. त्यानिमित्त हा विजय साजरा करण्यात आला. सरकारने दिलेल्या कागदोपत्री आरक्षण हे कागदावरच नव्हे तर याची अंमलबजावणी करावी. आता प्रत्येक घरात राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांसह मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा घरोघरी पूजन करण्यात येत आहे.

प्रत्येक घरावर दिवे व विद्युत रोषणाई करून दिवाळी साजरी होणार असल्याची माहिती प्रवीण कदम यांनी दिली.