
(Nagpur)नागपूर, 27 जानेवारी
रस्त्यावर वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळून सुरक्षितपणे कसे वाहन चालवायचे, याबाबत जनआक्रोशचे पदाधिकारी सतत निरनिराळ्या माध्यमांतून जनजागृती करीत असतात. त्याअनुषंगाने शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने येत्या, 1 ते 5 फेब्रुवारी या दरम्यान पथनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 10 ते 15 च्या गटाने मराठी, हिंदी किंवा इंग्रजी अशा कोणत्याही भाषेत 10 मिनिटांचे पथनाट्य सादर करता येणार आहे.
आवश्यक त्या संगीताची व्यवस्था शाळांनी स्वतः करायची आहे. पहिल्या फेरीत विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच पथनाट्य सादर करावे लागेल. त्यातून दुस-या फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांना विविध चौकांमध्ये सादरीकरण करावे लागणार आहे. विजेत्या गटांना रु. 15 हजार, 10 हजार, 5 हजार ची आकर्षक बक्षिसे तसेच प्रत्येक सहभागीला प्रमाणपत्र दिले जाईल. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता शाळांनी 29 जानेवारीपूर्वी डॉ. रवींद्र हरदास- 9423597950, सौ. बलसारा-9373254777 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जनआक्रोशचे सचिव रवींद्र कासखेडीकर ( Ravindra Kaskhedikar)यांनी केले आहे.