
(Mumbai)मुंबई : देशातील खुल्या वर्गावर अन्याय होणार नाही, ही माझी जबाबदारी असून मराठा आरक्षणासंदर्भात लवकरच आपण न्यायालयाची दारे ठोठावणार आहोत, असा इशारा वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिलाय. (Maratha Reservation) या आरक्षणामध्ये पाणी टाकण्याचे काम झाले आहे. मराठा जनेतेने कायद्याचे वाचन करावे, हे आरक्षण टिकणारे नाही, असेही ते म्हणाले.
सदावर्ते म्हणाले की, खुल्या वर्गातील गुणवंतांच्या जागा सुरक्षित राहिल्या पाहिजेत. मागास वर्गातील कष्टकरी आहेत, त्यांनाही न्याय मिळायला हवा. मात्र, आज दिलीय ती नोटीस आहे. आम्ही लवकरच न्यायालयात जाणार, संजय राऊतांनी माझ्या मराठा भावांना भरीस घातले आहे.
मराठा बांधवांनी कायद्याचे वाचन करावे आणि कलमे बघावीत, असा सल्लाही त्यांनी दिला. सगेसोयरे याबाबत जे काही बोलले गेले, ते आधीपासून कायद्यात अंतर्भूत आहेत. कुणीही या गोष्टीला विजयोत्सव वगौरे म्हणू नये. जरांगेंकडून ही दिशाभूल केली जाणारी बाब. वेगवेगळे स्टंट केले जातात, त्यांपैकी हा एक पॉलिटीकल स्टंट आहे. कायद्यात हे प्रकरण टिकू शकत नाही, डंके की चोट पर… कोणतीही बॅक डोअर एन्ट्री हा प्रकार कायद्याच्या संहितेत नाही, अशी तरतुद कायद्यात नाही, असे सदावर्ते म्हणाले.