
(Nagpur)नागपूर -मराठा आरक्षण संदर्भात तिढा सुटला याबद्दल सरकारचे आभार.आंदोलकांना वाटत असेल की, सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि त्यांना समाधान वाटत असेल, तर त्यांचं आणि सरकारनं मार्ग काढला म्हणून सरकारच मी अभिनंदन करतो. ओबीसी आरक्षणाला कोणताही यात धक्का नाही अशी भूमिका (National President of OBC Federation Dr. Babanrao Taiwade)ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केली. मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश आल्याच्या पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी बोलत होते. सगेसोयाऱ्यांच्या व्याख्येब
द्दल बोलल्या जात होते.वडील, आजोबा आणि पणजोबा यांच्या महसुली व शैक्षणिक कागदपत्रावर जी जात लिहिली असेल, ती त्यांच्या मुलांना व नातवंडांना लागू होते आणि तेच सरकारने दिलेल्या राजपत्रात लागू होते. त्यामुळे सरकारने नवीन काही दिलेले नाही म्हणून ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागला नाही. आता मराठा समाज त्या राजपत्राचा अभ्यास करेल की, आपल्याला काय मिळालं. आम्हाला दिलेला शब्द सरकारने पाळला, आम्हाला कोणताही धोका नाही.यामुळे आम्हाला आधी बोलल्यानुसार मुंबईत जाण्याची गरज नाही असा विश्वास डॉ. बबनराव तायवाडे यांनी बोलून दाखविला.