खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा शानदार समारोप
नागपूर, 22 डिसेंबर
युवकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या जुबिन नौटियाल यांच्या ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ ने खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या नवव्या पर्वाचा शानदार समारोप झाला. जुबिन नौटियालच्या रॉकिंग परफॉर्मन्स ने तरुणाई बेधुंद झाली. दुपारी बारा वाजेपासून पटांगणाबाहेर तरुणांच्या रांगा बघायला मिळाल्या. पटांगण खचाखच भरून होते.
ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर मागील दहा दिवसांपासून नागपूरच्या रसिकांनी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचा आनंद घेतला. सोमवारी महोत्सवाचा समारोप करताना कैसे जिऊंगा तेरे बिना, ना चैन से जीने दे, किन्ना सोणा तेणू रब ने बनाया, दुवा ना कोई, के राता लंबिया लंबिया रे, हा मुझे प्यार है तुमसे हा, तुम धडकन मैं दिल, तुजको है तुझसे राबता, अशा अनेक गाण्यावर तरुणाई थिरकली.
चार वर्षांपूर्वी नागपुरात आलो होते. आज परत नितीन गडकरी यांच्यामुळे परत आपण भेटलो आहोत, असे जूबीन म्हणाला.
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संस्कार भारतीच्या विदर्भ प्रांत प्रमुख कांचन गडकरी, राज्यमंत्री अॅड. आशीष जयस्वाल यांच्या उपस्थित दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब कुळकर्णी व रेणुका देशकर यांनी केले.
……..
लहानग्यांचे ढोलताशा वादन
समारोपीय कार्यक्रमाची सुरुवात ‘गजवर्क’ ढोलताशा पथकाच्या वादनाने झाली. त्यानंतर भारतातील छोट्या मुलांचे पहिले ढोलताशा व ध्वज पथक असलेल्या शिव नवयुग पथकाने शानदार वादन करीत वाहवा मिळवली.
……..
रसिकांमुळेच महोत्सव यशस्वी – नितीन गडकरी
खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या नवव्या पर्वातील सकाळ व संध्याकाळच्या सत्राला प्रचंड गर्दी करून रसिकांनी हा महोत्सव यशस्वी केला. महोत्सवाचे नावे दोन विश्वविक्रमाची नोंद होणे, ही देखील अभूतपूर्व घटना आहे. फेसबुक, इन्स्टा, युट्यूब, लाईव्ह स्ट्रीमिंग यासारख्या सोशल माध्यमातून हा महोत्सव 1 कोटी 52 लाख लोकांपर्यंत पोहोचला आहे. महोत्सवाचे स्वरूप दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून ही जागा कमी पडते आहे, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
……
महोत्सवाच्या यशस्वीतेचे मानकरी
खासदार सांस्कृतिक महोत्सव यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस झटलेल्या सर्व सदस्यांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, डॉ. दीपक खिरवडकर, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर, विजय फडणवीस, महेंद्र राऊत, दिलीप गौर, शैलेश ढोबळे, माया इवनाते, प्रमोद पेंडके, राम अंबुलकर, किसन गावंडे, दिलीप गौड, महेंद्र राऊत, प्रसन्न अटाळकर, संदीप बारस्कर, सनी जयस्वाल, मेहबूब भाई, शंतनू वेळेकर यांचा त्यात समावेश होता.