न्याय नाकारणं यापेक्षा न्यायाला विलंब हे घटनाविरोधी – संजय राऊत

0

मुंबई- या सरकारच्या घटनात्मक वैधतेचा निर्णय होणं गरजेचं आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निकालाची पूर्तता होईपर्यंत हे सरकार कायदेशीर की बेकायदेशीर? हे ठरणे गरजेचे आहे. आमच्या दृष्टिकोनातून हे बेकायदेशीर आहे.या वक्तव्यावरून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधामध्ये सरकारची ही भूमिका आहे. मुळात न्यायाला व्हिलन देखील घटनाविरोधी आहे असा आरोप शिवसेना नेते खा संजय राऊत यांनी केला.

राऊत म्हणाले, नाशिकमध्ये माझ्या पत्रकार परिषदेला जे पत्रकार उपस्थित होते, त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. त्यांना हवी तशी स्टेटमेंट द्या, असा दबाव पोलीस करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मेलेल्या पोपटा विषयी भाष्य केलेलं आहे. पोपट मेलेला आहे, फक्त विधानसभा अध्यक्षांनी ते घोषित करायचं आहे. शिंदे गटाचा पोपट मेलेला आहे. अख्या सरकारमध्ये जर कोणी शहाणा माणूस असेल तर ते देवेंद्र फडणवीस असा माझा समज होता.

परंतु , तेच असं जर बोलत असतील तर शहाणपणाच्या व्याख्या बदलाव्या लागतील.त्यांना कायदा, प्रशासन कळतो, ते सगळ्यांच्या संपर्कात आहेत, तरीदेखील ते अशी वक्तव्य करत आहेत, म्हणजे त्यांची काहीतरी मजबुरी दिसत आहे. विधानसभा अध्यक्षनार्वेकर सुद्धा कायद्याचे जाणकार आहेत. मात्र,त्यांना जर दुर्योधनाच्या बाजूने उभा राहायचं असेल तर कायद्याची पदवी ही पेटीत बंद करावी. न्याय नाकारणे यापेक्षा न्यायला विलंब करणे हे घटनाविरोधी आहे.