कळमेश्वरच्या सुचितचे कार्य प्रेरणादायी
कळमेश्वर. पदवीचे शिक्षण झाल्यानंतर गाव सोडून महानगरात नोकरीसाठी जाणाऱ्यांची संख्या गत दशकभरात वाढली आहे; मात्र आपल्या गावातच समृद्धी शोधण्याचा संकल्प कळमेश्वर तालुक्यातील तेलगाव (Telgaon in Kalameshwar Taluka) येथील सुचित ठाकरे याने केला. तो वास्तवातही साकारला. कळमेश्वर तालुक्यात कपाशी, तूर, सोयाबीनसह भाजीपाल्याचे (Vegetables including cotton, tur, soybeans )सुद्धा उत्पादन घेतले जाते; मात्र यासाठी शेतकऱ्यांना दूर अंतरावरून रोपे आणावी लागत होती. यासाठी अधिकचा खर्च करावा लागत होता. हीच बाब त्याच्यासाठी संधी ठरली. संधी हेरून त्याने तालुका कृषी कार्यालयासोबत संपर्क साधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेतून (Punyashlok Ahilya Devi Holkar Nursery Scheme) शेडनेट उभारण्याचा निर्णय घेत एक वर्षाच्या अगोदर कृतीत उतरविला होता. अल्पावधीतच भाजीपाला रोपवाटिकेची आर्थिक उन्नती साधली आहे. त्याने साधलेली किमया गावातून पलायन करणाऱ्या युवकांसाठी प्रेरणादायी ठरावी, अशीच आहे.
बी.ए. (संगीत) शिक्षण झालेल्या सुचितने पुणे येथे एका खासगी कंपनीत नोकरी स्वीकारली. सोबतच संगीत शिक्षक म्हणून पार्टटाइम काम करून चरितार्थ चालवण्याचा प्रयत्न केला; परंतु स्वतःकडे असलेल्या ४ एकर शेतीमध्ये नवीन काहीतरी करू या जिद्दीने कमी क्षेत्रात अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या पिकाचा शोध घेताना रोपवाटिका हा नवीन पर्याय त्याला मिळाला. शासकीय योजनेचा लाभ घेत गावातच रोजगार शोधावा असा विचार करून त्याने पुणे सोडत गाव गाठले. तालुक्यातील भाजीपाला उत्पादकांची गरज लक्षात घेता रोपे तयार करून विकण्याचे ठरविले.
सुचित याने आतापर्यंत मिरची, टोमॅटो, सिमला मिरची, वांगी, टरबूज, फुलकोबी, पत्ताकोबीची ८ लाख ४० हजारांवर रोपे तयार करून विकली आहेत. यातून त्याला आतापर्यंत शेडनेट, मजुरी, बी बियाणे आदीचा खर्च वजा जाता ३ लाख २५ हजार रुपयांचा नफा झालेला आहे.
सर्वदूरून मागणी
रोपवाटिकेतील रोपांचा दर्जा चांगला असल्याने कळमेश्वर, काटोल, सावनेर तालुका तसेच मध्य प्रदेशातील पांढुर्णा व सौंसर येथूनही शेतकरी स्वतः रोपे तयार करण्यासाठी ऑर्डर बुक करतात. यासोबतच त्यांनी गावातील सात ते आठ महिलांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. सध्या कांद्याचे रोप तयार करण्यासाठी सहा किलो बियाणांची लागवड करण्यात आली आहे. रोपवाटिकेसाठी तालुका कृषी अधिकारी राकेश वसु, कृषी सहायक रोशन नान्हे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.’
कळमेश्वर. पदवीचे शिक्षण झाल्यानंतर गाव सोडून महानगरात नोकरीसाठी जाणाऱ्यांची संख्या गत दशकभरात वाढली आहे; मात्र आपल्या गावातच समृद्धी शोधण्याचा संकल्प कळमेश्वर तालुक्यातील तेलगाव (Telgaon in Kalameshwar Taluka) येथील सुचित ठाकरे याने केला. तो वास्तवातही साकारला. कळमेश्वर तालुक्यात कपाशी, तूर, सोयाबीनसह भाजीपाल्याचे (Vegetables including cotton, tur, soybeans )सुद्धा उत्पादन घेतले जाते; मात्र यासाठी शेतकऱ्यांना दूर अंतरावरून रोपे आणावी लागत होती. यासाठी अधिकचा खर्च करावा लागत होता. हीच बाब त्याच्यासाठी संधी ठरली. संधी हेरून त्याने तालुका कृषी कार्यालयासोबत संपर्क साधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेतून (Punyashlok Ahilya Devi Holkar Nursery Scheme) शेडनेट उभारण्याचा निर्णय घेत एक वर्षाच्या अगोदर कृतीत उतरविला होता. अल्पावधीतच भाजीपाला रोपवाटिकेती आर्थिक उन्नती साधली आहे. त्याने साधलेली किमया गावातून पलायन करणाऱ्या युवकांसाठी प्रेरणादायी ठरावी, अशीच आहे.
बी.ए. (संगीत) शिक्षण झालेल्या सुचितने पुणे येथे एका खासगी कंपनीत नोकरी स्वीकारली. सोबतच संगीत शिक्षक म्हणून पार्टटाइम काम करून चरितार्थ चालवण्याचा प्रयत्न केला; परंतु स्वतःकडे असलेल्या ४ एकर शेतीमध्ये नवीन काहीतरी करू या जिद्दीने कमी क्षेत्रात अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या पिकाचा शोध घेताना रोपवाटिका हा नवीन पर्याय त्याला मिळाला. शासकीय योजनेचा लाभ घेत गावातच रोजगार शोधावा असा विचार करून त्याने पुणे सोडत गाव गाठले. तालुक्यातील भाजीपाला उत्पादकांची गरज लक्षात घेता रोपे तयार करून विकण्याचे ठरविले.
सुचित याने आतापर्यंत मिरची, टोमॅटो, सिमला मिरची, वांगी, टरबूज, फुलकोबी, पत्ताकोबीची ८ लाख ४० हजारांवर रोपे तयार करून विकली आहेत. यातून त्याला आतापर्यंत शेडनेट, मजुरी, बी बियाणे आदीचा खर्च वजा जाता ३ लाख २५ हजार रुपयांचा नफा झालेला आहे.
सर्वदूरून मागणी
रोपवाटिकेतील रोपांचा दर्जा चांगला असल्याने कळमेश्वर, काटोल, सावनेर तालुका तसेच मध्य प्रदेशातील पांढुर्णा व सौंसर येथूनही शेतकरी स्वतः रोपे तयार करण्यासाठी ऑर्डर बुक करतात. यासोबतच त्यांनी गावातील सात ते आठ महिलांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. सध्या कांद्याचे रोप तयार करण्यासाठी सहा किलो बियाणांची लागवड करण्यात आली आहे. रोपवाटिकेसाठी तालुका कृषी अधिकारी राकेश वसु, कृषी सहायक रोशन नान्हे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.