रुग्ण सेवेसाठी पर्याची व्यवस्था सज्ज ठेवा जिल्हाधिकाऱ्यांच्या आरोग्य विभागाला सूचना : उपाययोजनांचा घेतला आढावा

0

वर्धा. जुन्या पेंशनच्या मागणीसाठी राज्य सरकारच्या अधिन असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा संप तीन दिवसांपासून सुरू (State government employees are on strike for three days) आहे. यामुळे शासकीय यंत्रणा पुरती कोलमडली (entire government system collapsed ) आहे. आरोग्य व्यवस्थेवरही मोठा परिणाम झाला आहे. अनेक रुग्णालयांतील शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या आहेत. अनेक ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना दुखणे सोबत घेऊनच परतावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर वर्धा येथील जिल्हाधिकारी (Collector of Wardha ) राहुल कर्डिले यांनी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा आढावा (Review of Public Health System) घेतला. आरोग्य व्यवस्था सुरळीत सुरू राहील याची‎ दक्षता घ्या. संप लांबल्यास पर्यायी व्यवस्था‎ तयार ठेवा, असे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा शल्य‎ चिकित्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा आरोग्य‎ अधिकारी डॉ. रा. ज. पराडकर, दत्ता मेघे‎ आयुर्विज्ञान संस्थेचे विशेष कार्यकारी‎ अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, जवाहरलाल नेहरु‎ वैद्यकीय महाविद्यालयाच्या कम्युनिटी मेडिसिन‎ विभागाचे अधिष्ठाता डॉ. अभय गायधने,‎ कस्तुरबा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.‎ पूनम वर्मा शिवकुमार, कार्यालय अधीक्षक‎ गिरीश देव आदी उपस्थित होते.‎
संपूर्ण संपकाळात आरोग्य‎ व्यवस्था सुरळीत राहतील व रुग्णांना‎ कोणत्याही प्रकारच्या त्रासाला समोर जावे‎ लागणार नाही, याची खबरदारी सर्व शासकीय रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयांनी घ्यावी,‎ अशी सूचना त्यांनी केल्या.‎ जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी पुढील कालावधीसाठी तयार केलेल्या आराखड्यावर चर्चा करण्यात‎ आली. कस्तुरबा रुग्णालय व आचार्य विनोबा‎ भावे रुग्णालयाने देखील आराखडा तयार‎ करावा. शासकीय रुग्णालयांना मनुष्यबळाची कमतरता भासल्यास या दोनही रुग्णालयांनी‎ मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याची तयारी‎ बैठकीत दर्शविली. कस्तुरबा रुग्णालयाने‎ आपले दिव्यांग मंडळ कायमस्वरुपी पूर्ववत‎ ‎ सुरू ठेवण्यास त्यांनी सांगितले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय आणि ग्रामीण आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग‎ नोंदवला असल्याने आरोग्य विभागात रुग्णांची परवड होऊ नये, यासाठी सावंगी मेघे रुग्णालयातील डॉक्टर सज्ज‎ ठेवण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी मागणी केल्यास डॉक्टर उपलब्ध करून‎ देण्यात येणार आणि सोबतच नर्सिंग विद्यार्थ्यांची मागणी करण्यात आली असल्याचे डॉ अभ्युदय मेघे यांनी सांगितले.