रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर (Nagpur), 3 ऑगस्ट
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (Rashtrasant Tukdoji Maharaj)यांच्या समग्र जीवनावर आधारित महानाट्य ‘क्रांतीनायक’ या महानाट्याचा 53 वा प्रयोग शनिवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडला. या प्रयोगाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन द्वारा आयोजित करण्यात आलेल्या या महानाट्याची निमिती रंगभूमी नागपूर द्वारे करण्यात आली होती.
यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ संजय दुधे (Dr. Sanjay Dudhe, Vice-Chancellor of Nagpur University), मानवविज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता शाम कोरेटी, राष्ट्रीय सेवा योजनाचे संचालक डॉ. सोपानदेव पिसे, विशेष कार्याधिकारी डॉ. प्रदीप बिनिवाले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनच्या प्रमुख डॉ विजयालक्ष्मी थोटे, प्रमोद तिजारे, जेष्ठ रंगकर्मी नीलकांत कुलसंगे, डॉ. संजय कवीश्वर, डॉ. प्रशांत कडू, डॉ. प्रशांत माहेश्वरी, डॉ मनीषा यमसनवार गुरुदेव सेवा मंडळाचे बरेच गुरुदेव भक्त उपस्थित होते.
लेखक पुरुषोत्तम मिराशी तर दिग्दर्शक विलास कुबडे होते तर तुकडोजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या रमेश लखमापुरे यांनी हे पात्र जीवंत केले. समर्पक संगीत वीरेंद्र लाटणकर, नृत्यदिग्दर्शक सतीश बगडे, निर्मिती अमित कुबडे, प्रकाश योजना किशोर बत्तासे, निर्मिती सहाय्य वामन काचोळे, विशेष मार्गदर्शन संजय रहाटे, वेशभूषा शामला कुबडे, रंगभूषा लालजी श्रीवास, नेपथ्य रमेश शेळके यांचे होते. अपर्णा लखमापुरे, रेश्मा इंदुरकर, बिस्मार्क भिवगडे, अमित सावरकर, नितीन पात्रीकर, भास्कर मेश्राम, मिलिंद रामटेके, मोहन पात्रीकर, दीप्ती भाके, मालती वराडे, वर्षा मानकर, स्वप्निल भोंगाडे, नंदू मानकर, प्रशांत मंग्दे, अभिषेक बेल्लरवार, रवींद्र भुसारी, अशोक गवळी, तुषार पाठक, श्रद्धा रायकर, श्रीकांत धबडगावकर, वैभव नक्षीने करुणा मंग्दे यांच्यासह 60 कलावंताच्या चमूने नृत्य, संगीत, नाट्याच्या माध्यमातून तुकडोजी महाराजांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला.