ajit pawar jansanman yatra:’जनसन्मान’ यात्रेच्या निमित्ताने झंझावाती दौरे

0

 ajit pawar jansanman yatra: मुंबई (Mumbai), 4 ऑगस्ट – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar, National President of the Nationalist Congress)हे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘जनसन्मान’ यात्रेच्या निमित्ताने महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजना व महायुती सरकारने केलेले जनसेवेचे कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दौरा करणार असून या जनसन्मान यात्रेसाठी ७ समन्वयकांची तर ८ सहसमन्वयकांची यादी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आली आहे.

जनसन्मान यात्रेसाठी समन्वयक म्हणून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे, क्रीडामंत्री संजय बनसोडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांची तर सहसमन्वयक म्हणून आमदार राजेश विटेकर, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, राजेंद्र जैन, श्रीमती सुरेखाताई ठाकरे, सुरेश घुले,श्रीमती राजलक्ष्मी भोसले, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी आदींवर जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (MP Sunil Tatkare)यांनी दिली आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा