“शेवटी आलेल्यांना आधी जेवण..”..बच्चू कडूंची नाराजी

0

(Mumbai)मुंबई– “जे शेवटी आलेत त्यांना आधी जेवण मिळाले आणि आधी आलेल्यांना आता शेवट जेवण मिळणार. कुणी नाराज असेल तर माहित नाही. पण, आता नाराजी करून काही होणार नाही”, या शब्दात (MLA Bachu Kadu)आमदार बच्चू कडू यांनी अप्रत्यक्षरित्या नाराजी प्रकट केली. राष्ट्रवादीत बंड करणाऱ्या ९ जणांना मंत्रिपदे मिळाली आहेत. त्यामुळे शिंदे गट व अपक्षांचा गट नाराज असल्याची चर्चा असून आमदार कडू यांचे वक्तव्य तेच स्पष्ट करणारे ठरत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रीमंडळ विस्तार लवकर करावा, अशी मागणी आमदार बच्चू कडू हे करीत आहेत. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच ९ आमदारांचा शपथविधी पार पडला. शिंदे गटातील आमदार (NCP)राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशामुळे नाराज असल्याच्या चर्चांवर बच्चू कडूंना माध्यमांनी विचारणा केली असता आमदार कडू म्हणाले की नाराज होण्याचे कारण नाही. कारण खोके म्हणणारे आता ओके झालेत. सरकार चांगले झाले. स्वागतच आहे. (Eknath Shinde) शिंदे आणि (Devendra Fadnvis)फडणवीसांच्या वेगवान विकासाची भुरळ (Ajit Pawar)अजित पवारांना पडली. त्यामुळे विकासात आपण मागे राहू नये यासाठी ते सरकारमध्ये सामील झाले, उपमुख्यमंत्री झाले. त्यांचं अभिनंदनच आहे. पण, जे शेवट आले, त्यांना आधी जेवण मिळाले आणि आधी आलेल्यांना आता शेवट जेवण मिळणार की काय माहिती नाही, असेही ते म्हणाले. नाराजीचा सूर असला तरी तो दाखवता येत नाही. आपलेच ओठ, आपलेच दात आणि आपलीच जीभ आहे. आता कोणासमोर बोंबलावं अशी स्थिती असल्याचे कडू म्हणाले.