
बीड- सहा महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करत बीआरएसमध्ये प्रवेश केलेले बीड येथील शिवराज बांगर यांनी बीआरएस भाजपची बी टीम असल्याचा आरोप करत पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले. बीआरएसने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसमधील अस्वस्थ मंडळींना गळ घालण्यासाठी काही एजंट नेमले असून हे एजंट आर्थिक आणि राजकीय आमिष दाखवून त्यांचे प्रवेश घडवून आणत आहेत. प्रवेश देताना वेगळी भूमिका आणि प्रवेश दिल्यानंतर वेगळी भूमिका असे बीआरएसचे धोरण आहे. काही दिवसांचा अनुभव आल्यानंतर आमचा भ्रमनिरास झाला असून उद्या महाराष्ट्रातील जनतेवर ही वेळ येऊ नये म्हणून आम्ही वेळीच सर्वांना सावध करणार आहोत, असेही शिवराज बांगर यावेळी म्हणाले. दरम्यान शिवराज बांगर यांच्यानंतर आता धाराशिवमधील काही पदाधिकारी ही बीआरएसला सोडचिट्टी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
Related posts:
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog
जंगलात तेंदूपत्ता तोडताना दबा धरून बसलेल्या वाघाचा हल्ला, परिसरात दहशतीचे वातावरण
May 22, 2026Artical Blog
















