क्रौर्याची परिसीमा! मुलांना विष देत बापाची आत्महत्या

0

मुलीचा मृत्यू, मुलगा गंभीर ; वाठोड्यात संक्रांतीलाच दुर्दैवी घटना

नागपूर. मकर संक्रांतीचे (Makar Sankranti ) पर्व रविवारी सर्वत्र जल्लोषात साजरे करण्यात आले. सर्वत्र आनंद साजरा होत असतानाच नागपुरात (Nagpur) भयावह घटना उघडकीस आली. एका सैतान बापाने क्रौर्याची परिसीमा गाठली. पत्नीसोबतच्या वादाचा बदला घेण्यासाठी चक्क स्वत:च्याच मुलामुलीला विष दिले (father poisoned the child). यात सात वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून १२ वर्षीय मुलगा गंभीर जखमी आहे. तर दुसरीकडे बापानेदेखील गळफास घेऊन आत्महत्या केली (father also committed suicide by hanging himself). वाठोडा पोलिस ठाण्याअंतर्गत ही हृदयद्रावक घटना घडली. ही घटना उघडकीस आल्यापासून समाजमन हादरले आहे. मुलांबद्दल हळहळ तर बापाबद्दल संताप व्यक्त होतो आहे. वाद मोठ्यांचा होता, त्यात लहान मुलांची चुक काय?, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. मनोज अशोक बेले (४५) असे सैतानी बापाचे नाव आहे. पत्नी प्रियासोबत सुरुवातीचे काही दिवस गुण्यागोविंद्याने नांदल्यानंतर संसारात वाद सुरू झाला. सातत्याने वाद होऊ लागले. यामुळे दोघांनीही वेगवेगळे रहण्याचा निर्णय घेतला. 7 वर्षीय तनिष्का व १२ वर्षीय प्रिन्स हे आईसोबत रहायचे. तर मनोज हा वाठोड्यातील नागोबा गल्ली येथे रहायचा. पती-पत्नीने आपापसात केलेल्या समझोत्यानुसार तनिष्का व प्रिन्स हे दर रविवारी वडिलांकडे जायचे. दिवसभर थांबून परत आईकडे यायचे. त्यानुसार रविवारी सकाळी आजोबांनी दोघांना मनोजच्या घरी सोडले. मनोजने मुलांना खाऊपिऊ घातले. पण, त्याच्या डोक्यात वेगळेच काही होते. त्याची पुसटशी जाणीवही निरागस जीवांना झाली नाही. त्याने जेवणात विष कालवले होते. ते खाल्ल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. सैतान संचारलेल्या बापाने त्यांचा गळा आवाळण्याचादेखील प्रयत्न केला. दोघांचीही प्रकृती खराब झाल्याने त्यांना उपचारासाठी भरती करण्यात आले. त्यात तनिष्काचा मृत्यू झाला, तर प्रिन्सवर मेडिकल इस्पितळात उपचार सुरू आहेत. इकडे हा घटनाक्रम सुरू असतानाच मनोजने स्वत:च्याच घरी लाकडी बल्लीला गळफास घेऊन आत्महत्या केली. वाठोडा पोलिसांनी मृतक मनोजविरोधात गुन्हा नोंदविला असून तपास सुरू आहे.

राजस्थानी घेवर आणि मक्के की ढोकळी : | Shankhnaad Khadya Yatra Ep.no 73

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा