दिड महिन्यातच लोकसभा निवडणुका लागतील

0

(Prakash Ambedkar)प्रकाश आंबेडकर

(Chhatrapati Sambhaji Nagar)छत्रपती संभाजी नगर-सार्वत्रिक निवडणुका २०२४ मध्ये होणार असल्या तरी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना (VBA Leader Prakash Ambedkar) निवडणुका येत्या दिड दोन महिन्यांतच लागतील, असे वाटत आहे. आम्ही निवडणुकांची तयारी केली असून भाजपविरोधात लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमचा महाविकास आघाडीशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आंबेडकर म्हणाले, आमची शिवसेनेच्या ठाकरे गटाशी युती आहे. आमचा महाविकास आघाडीशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे या निवडणुकीत काय करायचे, हे महाविकास आघाडीने स्वतः ठरवायचे आहे. आम्ही शिवसेनेसोबत आहोत. त्यांनी त्यांचे पहावे. दरम्यान, यावेळी मणिपूरमध्ये (Industrialist Gautam Adani)उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठी हिंसाचार सुरू असल्याचा दावा आंबेडकरांनी केला. खनिजांवर मूळ ताबा आदिवासींचा आहे. मैतेई समूहाने आरक्षणाची मागणी केली नाही. पण त्यानंतरही त्यांना अचानक का आदिवासी घोषित केले गेले?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे या खाणींच्या मंजुरीसाठीच मैतेई समाजाला आरक्षण देऊन वातावरण तापवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.