प्रभू श्रीराम विराजमान, कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न पूर्ण

0

अयोध्या Ayodhya : अयोध्येत रामजन्मभूमीवर श्रीराम मंदिराची निर्मिती आणि त्यात श्रीराम विधिवत विराजमान होण्याचे कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न आज पूर्ण झाले. देश ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता, तो क्षण आज याचि देही, याचि डोळा अवघ्या देशानेच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात वास्तव्याला असलेल्या हिंदु समाजाने अनुभवला. अभूतपूर्ण अशा सोहळ्यात पंतप्रधान Sarsanghchalak Dr. Mohanrao Bhagwat from Narendra Modi, Chief Minister of Uttar Pradesh Yogi Adityanath नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्र योगी आदित्यनाथ यांच्या हजारो साधुसंध आणि मान्यवरांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामाची अयोध्येतील भव्यदिव्य राम मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. साऱ्या देशाने हा क्षण आपल्या डोळ्यात साठवून ठेवला. विशेषतः १९९० आणि १९९२ च्या कारसेवेत सहभागी झालेल्या कारसेवकांसाठी हा क्षण अत्यंत भावूक असा होता.

१२ वाजून २९ मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर जयश्रीरामच्या गजरात ही प्रतिष्ठापना संपन्न झाली. यावेळी देशाच्या नजरा टीव्हीच्या माध्यमातून अयोध्येतील सोहळ्यावर स्थिरावल्या होत्या. या निमित्ताने देशभरात कार्यक्रमाचे आयोजन झाले. ( Ayodhya Pran Pratishtha ceremony) तब्बल ५०० वर्षांनंतर प्रभू श्रीराम विधीवत राम मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुष्ठान पूर्ण केलं. यावेळी हेलिकॉप्टरमधून पृष्पवृष्टी करण्यात आली. या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली होती. कलाकार, खेळाडूंसह देशभरातील नागरिक अयोधा मंदिर परिसराच्या प्रांगणात स्थानापन्न होते. प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा हा आनंदाचा सोहळा जगभरातील लोकांनी ‘याची देही याची डोळा पाहिला. हा सोहळा नयनरम्य होता, उपदेशात्मक होता, ऊर्जात्मक होता. जीवनाला दिशा व जगण्याला उद्देश देणारा ठरला.
अत्यंत नेत्रदीपक असे अलंकार घातलेली प्रभूश्रीरामांची तेजोमय बालमूर्तीचे दर्शन झाल्यावर सर्वत्र जयघोष झाला. यावेळी प्रतिष्ठापनेची पुजा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुर्ता आणि धोतर असा खास पेहराव पंतप्रधानांनी केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर लिहिलंय की, “अयोध्येमध्ये श्री रामाच्या अभिषेकचा अलौकिक क्षण सर्वांनाच भावूक करणारा आहे. या दैवी कार्यक्रमाचा एक भाग होणे माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. जय सिया राम.”

दिग्गजांची उपस्थिती –

प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा अनेकांनी ‘याची देही याची डोळा पाहिला. या सोहळ्याला देशभरातील दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये कलाकार, व्यावसायिक, राजकीय नेते, खेळाडूंचा समावेश होता. महानायक अमिताभ बच्चन, रजनीकांत, अभिषेक बच्चन, क्रिकेटर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रविंद्र जाडेजा, अनिल कुंबळे, अभिनेत्री कंगना राणावत, अरुण गोविल, दिपीका चिखलीया यांच्यासह अनेक सेलिब्रिटी या भव्यदिव्य सोहळ्याला उपस्थित होते.