मुंबई MUMBAI २२ जानेवारी: मुंबईमध्ये काल, रविवारी टाटा मॅरेथॉन पार पडली. मात्र या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतलेल्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाले आहेत. यामध्ये. राजेंद्र बोरा (७४) आणि सुवरदीप बॅनर्जी (४५) हे स्पर्धक मॅरेथॉनमध्ये धावत असतानाच अचानक खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी असलेल्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. तसेच स्पर्धेत भाग घेतलेल्या २२ जणांना विविध कारणांनी रुग्णालयात दाखल करावे लागले.