
वर -वधू मेळाव्यांची वाढती संख्या चिंतेची बाब, रविवारी राज्यस्तरीय परिसंवाद -वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली मान्यवरांचा सहभाग नागपूर -आज नवोदितांचे विवाह जुळवणे ही खरेतर कुठल्याही पालकांसाठी मोठी समस्याच असते.या दृष्टीने वर -वधू परिचय मेळावे निश्चितच हितकारक आहेत. मात्र सामाजिक दृष्टीने या मेळाव्यांची वाढती संख्या चिंतेचीच बाब आहे. राज्यातील या वाढत्या मेळाव्याच्या दृष्टीने साधकबाधक चर्चा करण्याच्या हेतूने उद्या रविवार दि 9 जुलै रोजी नागपुरातील हॉटेल तुली इम्पेरियल येथे महाराष्ट्रस्तरीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक जाणिवेतून हा परिसंवाद होत असून रविवारी दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत होणाऱ्या या परिसंवादात भाजप नेते आमदार मदन भाऊ येरावार, आमदार समीरभाऊ कुणावार, नंदू भाऊ गादेवार आणि गणेश भाऊ चक्करवार या मान्यवरांची प्रामुख्याने यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.