नागपूर -गुजरात उच्च न्यायालयाने ‘मोदी आडनाव’ टिप्पणीविरोधातील खटल्यात राहुल गांधींना दोषी ठरवण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे. यावर प्रतिक्रिया देताना नुकतेच भाजपामध्ये प्रवेश घेतलेले डॉ. आशिष देशमुख म्हणाले, “संपूर्ण देशात 54% ओबीसी समाज असून त्यांच्या भावना दुखावल्या असल्यास राहुल गांधी यांनी माफी मागून हा विषय इथेच संपवावा, ही माझी भूमिका होती. राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला तर राहुल गांधी अडचणीत येतील, असे मी त्यावेळी म्हटले होते. माझे ते वक्तव्य आज खरे ठरले. हा निर्णय देऊन उच्च न्यायालयाने ओबीसींच्या भावनांचा आदर केला आहे. पुढील आठ वर्ष राहुल गांधी कोणतीही निवडणूक लढू शकणार नाहीत. ओबीसी समाजाला या निर्णयामुळे आनंद झाला आहे. मी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो.”असेही देशमुख यांनी म्हटले आहे