आजपर्यंत आजतागायत मी याआधी कधीही ना लिहिले ना म्हटले कि पवार संपले पण आता पुन्हा नव्याने पक्ष बांधू जाहीर सांगणारे पवार संपूर्ण पूर्णतः संपल्यात जमा आहेत पण ते कसे यापुढे राजकीय दृष्ट्या जिवंत राहतील त्यांचे अस्तित्व कसे आणखी टिकून राहू शकते त्यावर मी तुम्हाला येथे नक्की पटवून देणार आहे सांगणार आहे.
सरकारी नोकरीत अनेक अधिकारी कर्मचारी योग्य वेळी निवृत्त झालेत कि बाजूला होतात काही निवृत्ती आधीच स्वेच्छा निवृत्ती घेतात आणि काही त्यांचा अनेकांना मनापासून कंटाळा आला तरी त्या शरद पवार यांच्या खाजगी सचिव धुवाळी यांच्यासारखे वयाचे 80 झाले तरी नोकरीला चिटकून चिपकून राहतात. उद्धव ठाकरे यांचे वय 60 आहे म्हणून त्यांनी आता राजकारणातून एखाद्या प्रामाणिक कर्मचाऱ्यासारखी निवृत्ती पत्करून मोकळे व्हावे अन्यथा मराठी माणूसच त्यांना उचलून बाजूला फेकून मोकळा होईल एवढी पापे त्यांनी करून ठेवलेली आहेत पण जर जी चर्चा यादिवसात रंगली आहे तसे नेमके नक्की घडले म्हणजे उद्धव व राज खरोखरी एकत्र आले तर मात्र उद्धव यांना लगेचच राजकारणातून निवृत्त होण्याची गरज नाही. राज आणि उद्धव या दोघांनी पुन्हा एकत्र यावे असे मनसेच्या बैठकीतून सूर सर्वप्रथम आवळल्या गेले हे जे बाहेर मिडीयालासांगितल्या गेले आहे ते तसे अजिबात नाही,
हे सूर सर्वप्रथम मातोश्रीवर आवळल्या गेले त्यानंतर संजय राऊत यांनी मध्यस्थी करून हे असे मनसेला बोलायला भाग पाडल्याची माझी माहिती आहे आणि हे घडले तर मध्यस्थी करण्यात तरबेज असलेले राज भविष्यात नक्की उद्धव आणि कुटुंबाला अनेक विविध संकटातून बाहेर काढतील आणि उद्धव यांच्या राजकीय लोकप्रियतेचा करिश्मा त्यांची सामान्य माणसावरची जादू फारशी ओसरली नसल्याने राज आणि उद्धव एकत्र आल्यास एक प्रभावी प्रबळ विरोधी पक्ष म्हणून उद्धव राज सेना नक्की उठून उभी दिसेल. दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीचा, उसने अवसान आणून विधान सभा निवडणुका लागण्यापूर्वी शरद पवार कसेबसे राज्यात फिरून थोडीफार राजकीय शक्ती उभी करतील कारण यापुढे पवारांना एकतर पक्ष चिन्ह आणि त्यांच्या पक्षाचे नाव नव्याने घेऊन राज्यात महाराष्ट्रात फिरावे लागणार आहे त्यात पूर्वीची ती ताकद किंवा धावपळ करण्याची त्यांच्यात आता नक्की हिम्मत उरलेली नाही पण तरीही लेकीच्या भल्यासाठी राजकीय अस्तित्वासाठी त्यांना हे आधी करावे लागेल त्यानंतरच त्यांच्या गटाला राष्ट्रीय काँग्रेस मध्ये स्थान मिळेल प्रवेश मिळेल. यापुढे सोनिया गांधी जी चूक एकेकाळी याच पवारांच्या बाबतीत राजीव गांधी यांनी केली होती ती तशी पुन्हा करणार नाहीत, सारासार विचार करून त्यानंतर पक्ष बळकटीसाठी त्या पवारांना आपल्याकडे थारा देतील आश्रय देतील आश्रित म्हणूनच बघतील.
अजित पवारांनी जशी शरद पवार यांच्या हयातीतच राष्ट्रवादी हाती घेतली, शरद पवारांचा उरला सुरला पक्ष त्यांच्यानंतर त्यांची वादग्रस्त कन्या सुप्रिया सुळे हाती घेऊन त्यांच्या पक्षातली रणरागिणी म्हणून नावारूपाला येईल असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही समीर चौगुले यास थेट चार्ली चॅप्लिन ठरवता आहात किंवा आमच्या उदय तानपाठक यांच्या बाहुपाशात एखाद्या सिल्क स्मितेला सोडून मोकळे होताहेत असे मी म्हणेन. सुप्रिया यांना मोठ्या राजकीय मर्यादा आहेत पण त्याऐवजी पवार घराण्यातल्याच शिवबा आणि जिजाऊ यांच्याकडे तुमचे अजिबात लक्ष नाही आणि ते दोघे आहेत सुनंदा पवार आणि त्यांचा बेरकी हुशार आणि महत्वाकांक्षी पुत्र रोहित पवार. सुनंदाताई योग्य वेळ आली कि रोहितला नक्की सांगून मोकळ्या होतील, शिवबा उचल ते धनुष्य आणि लढून हो मोठा नेता या राज्यातला…
हेमंत जोशी, मुंबई