
यवतमाळ -मद्य प्राशन करून पुणे-नागपूर ट्रॅव्हल्स भरधाव चालवण्याचा प्रकार यवतमाळच्या दारव्हा येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी दारव्हा पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई दारव्हा पोलिस ठाण्यात करण्यात आली. गेल्या आठ दिवसांपूर्वी यवतमाळच्या विदर्भ ट्रॅव्हल्सचा अपघात होऊन 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना आता यवतमाळ हद्दीमध्ये ट्रॅव्हल्स चालवताना चालकाने मद्य प्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मद्य प्राशन करून चालक ट्रॅव्हल्स आडवी -तिडवी चालवत असल्याची बाब प्रवाशांच्या लक्षात आली. त्यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. याचीच दखल घेऊन पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालक अमृत प्रल्हाद थेर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.