Maharashtra Rain update | पुढील तीन दिवस कुठे येणार पाऊस; बघा हवामानाचा अंदाज

0

पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज

येत्या 14 मे रात्री विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, नागपूर मध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पंधरा मे रोजी वाशिम, यवतमाळ, गडचिरोली मध्ये तुरळ ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस येईल. 16 मे रोजी विदर्भातील बुलढाणा, अकोलामध्ये तुरळ ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 14 मे रोजी विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, नागपूरमध्ये वीज, मेघागर्जना, सोसायटीच्या वाऱ्याची शक्यता आहे. पंधरा मे रोजी वाशिम, यवतमाळ, गडचिरोलीमध्ये वीज मेघगर्जना सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. 16 मे बुलढाणा अकोलामध्येही मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस विदर्भातील काही शहरांमध्ये वीज, मेघगर्जना सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता दर्शवली आहे.

 

 

नंतरच्या दिवसांमध्ये काही शहरांमध्ये कमाल तापमान वाढण्याची शक्यता आहे. पाच दिवसात कमाल तापमानात दोन ते चार डिग्री सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर उत्तर कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. १५ मे दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, सातारा, सोलापूर | छ. संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, जालना | नागपूर, वर्धा, बुलढाणा, वाशिम | ठाणे, रायगड येथे विजा, वादळी वाऱ्यांसह काही ठिकाणी पाऊस येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा