
नागपूर(Nagpur),दि. 23 मार्च 2026: भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील धगधगते अग्निकुंड आणि तरुण पिढीचे स्फूर्तिस्थान मानले जाणारे शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या सर्वोच्च बलिदानाचा स्मृतिदिन आज महावितरणच्या नागपूर परिमंडलात मोठ्या उत्साहात आणि आदराने ‘शहीद दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. काटोल रोड येथील ‘विद्युत भवन’ या प्रशासकीय कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात क्रांतीकारकांच्या धैर्याला आणि राष्ट्रप्रेमाला उजाळा देण्यात आला.
याप्रसंगी मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रादेशिक कार्यालयातील मानव संसाधन आणि औद्योगिक संबंध विभागाने यावेळी शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या जीवनप्रवासावर आणि त्यांच्या महान कार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता संजय वाकडे यांच्यासह प्रादेशिक व परिमंडल कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख, वरिष्ठ अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी क्रांतीकारकांच्या स्मृतीस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
नागपूर येथील ‘विद्युत भवन’ मध्ये शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करतांना मुख्य अभियंता दिलीप दोडके. सोबत अधीक्षक अभियंता संजय वाकडे व अन्य अधिकारी, कर्मचारी.

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी
महावितरण, नागपूर














