Manoj Jarange Patil 25 पासून पुन्हा आमरण उपोषण – मनोज जरांगे पाटील

0

 

जालना- MARATHA SAMAJ  मराठा समाजाला आरक्षण संदर्भात राज्य सरकारने वेळ घेतला होता,आता सरकारने जर 24 तारखेच्या आत मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही, तर 25 तारखेपासून मी आमरण उपोषण पुन्हा सुरू करणार आहे असा इशारा Manoj Jarange Patil  मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.यावेळी एकदम कठोर आमरण उपोषण हे मराठा समाजाला न्याय मिळावे केले जाणार आहे. आरक्षणाचा प्रश्न संपेपर्यंत राजकीय नेत्याला गावबंदी. MAHARASHTRA महाराष्ट्रात प्रत्येक नाक्यावर साखळी उपोषण सुरू होईल.सरकारने आरक्षण घेऊनच गावात यायचं नाहीतर यायचं नाही. कोणीही उग्र आंदोलन करू नये, त्याला आमचं समर्थन नाही असे आंदोलन स्पष्ट करतानाच कोणीही आत्महत्या करू नये, आम्हाला तुमची गरज आहे असे आवाहन केले.शांततेचे आंदोलनचं आपल्याला मराठा आरक्षण देईल. गरिबांना न्याय देण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी ही विनंती. या आमरण उपोषणात वैद्यकीय सेवा, अन्न-पाणी घेतलं जाणार नाही असेही जाहीर केले.आमच्या गावात राजकीय पुढाऱ्यांनी यायचं नाही. जीआरमध्ये २००१ च्या कायद्याचा आधार हवा.

जीआरमध्ये ओबीसी OBC  समावेश आणि तो टीकायला हवा. आम्ही सरकारला ४० दिवस देऊन मान राखला. आता सरकारने आरक्षण देऊन मराठा समाजाचा मान राखावा. मात्र, यावेळी शांततेत सुरु होणारं आंदोलन सरकारला झेपणार नाही याकडे
मनोज जरांगे पाटील यांनी लक्ष वेधले.