मविआचे आज शक्तीप्रदर्शन

0

छत्रपती संभाजीनगरात वज्रमुठ सभा

छत्रपती संभाजीनगर (chtrpati sambhaji nagar)  दंगलीमुळे हादरलेल्या आणि अजुनही अस्वस्थ असणाऱ्या छत्रपती संभाजीनगरात (Chhatrapati Sambhaji Nagar ) रविवारी महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) वज्रमुठ सभा (Vajramuth Sabha ) होणार आहे. या सभेला लाखोंची गर्दी अपेक्षित असून मविआकडून शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. मविआची ही पहिलीच एकत्रित जाहिर सभा असल्याने नेते मंडळींसह कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे. तिन्ही पक्षांचे प्रमुख नेतेमंडळी उपस्थित राहुल यावेळी मार्गदर्शन करतील. सभास्थळी विस्तिर्ण मैदानावर सर्वच आवश्यक तयारी करण्यात आली आहे. दंगलींच्या पार्श्वभूमीवर सभा होत असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. सभेतील प्रत्येक घडामोडीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पाळत ठेवली जाणार आहे. परवानगी देतानाच पोलिसांकडून अटी घालून देण्यात आल्या आहेत. ही हायव्होल्टेज सभा ठरण्याची शक्याता असल्याने अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडीकडून सभेची तयारी करण्यात आली आहे. ही सभा यशस्वी होणार असल्याचा दावासुद्धा केला जात आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या विस्तिर्ण मैदानावर होणाऱ्या सभेच्या तयारीचा आढावा सातत्याने ठाकरे गटाच्या नेते मंडळींकडून घेतला जात आहे. तिन्ही पक्षांचे झेंडे लावून सभास्थळ सजविले गेले आहे. सुभाष देसाई, अनिल परब, चंद्रकांत खैरे, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे आदी संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सभास्थळाकडे जाणाऱ्या मार्गावर देखील चोख बंदोबस्त ठेवला गेला आहे. दरम्यान, या सभेचे नवा टिझरही लाँच करण्यात आला आहे. त्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भाषण करताना दिसत आहेत.

छत्रपती संभाजीनगर कायम शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. एआयएमआयएमनेसुद्धा आपला दबदबा दाखवून दिला आहे. त्यातच शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर अनेक नेते शिंदेंसोबत गेले आहेत. सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र ठाकरेंसोबतच असल्याचा दावा केला जात आहेत. छत्रपती संभाजीनगरातील अंबादास दाणवे, माज खासदार चंद्रकांत खैरे ठाकरेंसोबतच आहेत.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा