ट्रकवर धडकली भरधाव कार : वर्धाजिल्ह्यातील महाबळाजवळ भीषण अपघात
वर्धा (wardha) – राज्याच्या प्रगतीचा राजमार्ग असे वर्णन केले जातो तो समुद्धी महामार्ग (Samuddhi Highway ) मृत्यूचा सापळा ठरल्याचे चित्र आहे. या भार्गावर भीषण अपघातांची मालिका कायम असून वाहनचालकांना जीव गवावा लागत आहे. शक्य त्या साऱ्या उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, वेगावर नियंत्रण नसल्याने या घटना घडत आहेत. शनिवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास भरधाव कार मागून ट्रकवर धडकली (speeding car hit the truck). या अपघातात दोन डॉक्टर मैत्रिणींसह तिघांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात महाबळा (Mahabala in Selu taluk of Wardha district ) शिवारात समृद्धी महामार्गावर ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच जाम पोलिस चौकीतील पोलिस उपनिरीक्षक दिलीप थाटे सहकाऱ्यांसह अपघातस्थळी पोहोचले. पंचनामा करीत वाहतूक सुरळीत केली. या मार्गावरील अपघातांची मालिका वाहनचालकांसठी चिंतेची बाब ठरली आहे. (A speeding car collided with a truck: A terrible accident near Mahabala in Wardha district)
डॉ. ज्योती क्षीरसागर, डॉ. फाल्गुनी, भरत क्षीरसागर (Dr. Jyoti Kshirsagar, Dr. Falguni, Bharat Kshirsagar) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तिघेही एम एच 37जी.3558 क्रमांकाच्या व्हॅगनार कारने यवतमाळकडून नागपूरकडे जात होते. रात्री वाहनांची संख्या कमी असल्याने कारचा वेग जरा जास्तच होता. त्याचवेळी एम एच 04, डी एल. 8235 क्रमांकाचा ट्रकसुद्धा नागपूरच्या दिशेने जात होता. चालकाला पुढे ट्रकच्या वेगाचा योग्य अंदाज आला नाही आणि कार थेट ट्रकवर धडकली. घटनास्थळीच तिघांचा मृत्यू झाला. जाम पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त कार ही महिला चालवत होती अशी माहिती आहे. अंधारात समोरील ट्रक दिसला नसल्याने अति वेगात असलेल्या कारच्या स्टेरिंग वरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती आहे.