विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

0

मुंबई-राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवशन येत्या १७ जुलैपासून मुंबईत सुरु होणार आहे. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला असून त्यात ४ ऑगस्टपर्यंतचे कामकाजही निश्चित करण्यात आले आहे.गेल्या काही दिवसांपासून पावसाळी अधिवेशन लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण राज्याच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत नुकताच अधिवेशनाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (State Legislature Session)
राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षामुळे अधिवेशन पुन्हा एकदा वादळी ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अलिकडेच भाजप व शिवसेनेच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचा फुटीर गट अजित पवार यांच्या नेतृत्वात सहभागी झाला आहे. त्यामुळे त्याचे पडसादही अधिवेशनात उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यानिमित्ताने सरकारचे नेतृत्व करणाऱ्यांची कसोटी लागणार आहे. दुसरीकडे विधानसभेच्या अध्यक्षांनीही १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर कार्यवाही सुरु केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह १६ आमदारांवर अपात्रतेची तलवार लटकत आहे.