
ठाणे : “आम्ही जर विठ्ठलाभोवतीचे बडवे असू तर आम्हाला यापुढे काहीही नको. मी दूर कुठेतरी निघून जातो. तुम्ही सगळे परत या. मी व जयंत पाटील पक्ष सोडून जातो..” असे भावनिक वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडJitendra Awad यांनी केले आहे. नाशिककडे रवाना होत असलेल्या शरद पवारांचे स्वागत करण्यासाठी आयोजित कार्यक्रमाच्या वेळी ते प्रसार माध्यमांशी (NCP Leader Jitendra Awahad) बोलत होते.
आव्हाड म्हणाले, “अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या लोकांनी परत यावे, मी राजकारणातून दिसेनासा होईल. माझाच अडसर असेल तर मी बाजुला व्हायला तयार आहे. मी जयंत पाटील यांना देखील राजकारणातून बाजुला घेऊन जातो. आमची दोघांचीही तयारी आहे.”
“शरद पवारांना 84 व्या वर्षी असे का वागवता आहात? हे चुकीचे आहे. त्यांना निवृत्त व्हा, असे म्हणणे योग्य नाही. ज्याप्रकारे त्यांच्याबद्दल वक्तव्य झाली, ती बरोबर नाहीत”, असेही आव्हाड म्हणाले आहेत.
आधी नीट वागला असता तर-परांजपे
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यावर त्यांचे पूर्वीचे सहकारी आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर दिले असून तुम्ही जर आधीच नीट वागला असता, तर ही वेळ आलीच नसती, असे परांजपे म्हणाले.