
मुंबई Mumbai :अर्थमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीतील NCP नेत्यांना मोठ्या प्रमाणात निधी दिल्याच्या भूमिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी समर्थन केले आहे. जयंत पाटील म्हणाले,”मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून काही वर्ष काम केलय. मला कौतुक आहे. पुरवणी मागण्या 46 हजार कोटी पर्यंत गेल्या आहेत. सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करु शकतं. स्वप्न पूर्ण करण्यासाठी निधी मिळतोय, याचा आनंद आहे. मतदारसंघासाठी निधी मिळत असेल, तर चांगली बाब आहे.”
राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी २५ कोटी किंवा त्याहून अधिक निधी मंजूर करण्यात आला असून, त्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये खास तरतूद करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या काही आमदारांनाही निधी मंजूर करीत त्यांची नाराजी दूर करण्याचाही प्रयत्न अजितदादांनी केल्याचे दिसते.jayant patil
याचं जयंत पाटील यांनी समर्थन केलं.
लोक प्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघात निधी मिळाला तर थोडीशी खुशी राहणारच ना, असेही जयंत पाटील म्हणाले. मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मंजूर करण्यासाठी आमदारांकडून कामांची यादी मागविण्यात आली होती. विधिमंडळाला सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघांतील विकास कामांसाठी १५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, विरोधी पक्ष नेत्याच्या निवडी संदर्भात प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की, “ज्यांना पक्ष मोठा आहे, त्यांनी विधानसभा अध्यक्षांना कळवले पाहिजे. काँग्रेस पक्षातून लवकरच आज किंवा उद्या कळवले जाईल. या आठवड्यात निवड होऊ शकतो”, असेही ते म्हणाले.