Home MAHARASHTRA मिसेस ब्रह्मवादिनी विजेती पद्मा काईतवाडे तर प्रथम उपविजेती भैरवी दामले

मिसेस ब्रह्मवादिनी विजेती पद्मा काईतवाडे तर प्रथम उपविजेती भैरवी दामले

0

आद्यब्रह्मवादिनी फाऊंडेशन आणि श्रीकृष्ण ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मिसेस ब्रह्मवादिनी’ स्पर्धेत नागपूरमधील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्त्रीच्या अमर्याद क्षमतांचे प्रभावी दर्शन घडविले. मर्यादित परिस्थितीत आणि सीमित वेळेत स्वतःची प्रतिभा सादर करत त्यांनी “अपूर्ण विठ्ठलाला पूर्णत्व देणारी रुक्मिणी” ही संकल्पना साकार केली.

संस्थेच्या संस्थापिका डॉ. सौ. वृषाली शिलेदार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या स्पर्धेचे आयोजन साई सभागृह येथे करण्यात आले होते. या स्पर्धेचे उत्तम नियोजन मुख्य नियोजिका व संचालिका सौ. आरती महाजन यांनी केले. सहसंस्थापिका डॉ. सौ. योगिता कस्तुरे तसेच संचालक मंडळातील सौ. जयश्री धर्माधिकारी, वैशाली चिमोटे, अरुंधती महाजन, मेघा जोशी आणि अंजली देशपांडे यांच्या सहकार्याने ही चुरशीची स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली.

स्पर्धकांनी स्वतःची ओळख, कौशल्य प्रदर्शन आणि परीक्षकांसोबत प्रश्नोत्तर अशा तीन फेऱ्यांमधून आपली क्षमता आणि योग्यता सिद्ध केली. विविध स्पर्धकांनी पु. ल. देशपांडे, लता मंगेशकर तसेच इतर कलाकारांचे सादरीकरण, संस्कृत भाषेचा वापर, मूक अभिनयातून डॉ. आनंदीबाई जोशी यांची संघर्षगाथा, दिव्यांग स्त्रीच्या आकांक्षा, पर्यावरणाचे महत्त्व अशा विविध विषयांवर प्रभावी सादरीकरण करत सामाजिक जाणिवा अधोरेखित केल्या. आत्मभानासोबत सामाजिक दायित्वाचे भान जागवणाऱ्या या सादरीकरणांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

कार्यक्रमस्थळी खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही आकर्षण ठरले. चिमुकल्यांच्या उत्साहातून गुलाबपुष्प व शेला देत केलेल्या स्वागतापासून ते बक्षीस वितरणापर्यंत संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आद्यब्रह्मवादिनी फाऊंडेशनच्या संचालिका सौ. अरुंधती महाजन यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. त्यांना नवोदित निवेदिका कु. आकांक्षा वालकर आणि गीता सोहोनी यांनी उत्तम साथ दिली. डॉ. मेघा जोशी यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला. सौ. वैशाली चिमोटे यांनी नऊवारी साडीच्या विविध प्रकारांची आधुनिक पद्धतीने आकर्षक झलक सादर केली, तर आभार प्रदर्शन सौ. अंजली देशपांडे यांनी केले.
स्पर्धेचे परिक्षण- सौ सीमा पागे,सौ अनिता श्रौती, सौ. केतकी काणे सालनकर व सौ. ऋतुजा दुरूगकर ह्यांनी केले .
कोरिओग्राफर अहजर, कस्तुरी शेंडे, प्रांजली अरमरकर , व श्रिया अणे ह्यांनी
ह्या स्पर्धेतील स्पर्धकांना विशेष प्रशिक्षण दिले.

*स्पर्धेतील विजेत्याः*
*विजेती- पद्मा काईतवाडे*
*११०००₹ रोख, पैठणी, लॅवी पर्स, आणि दागिने*
*प्रथम उपविजेती-भैरवी दामले*
*७००० ₹ रोख, पैठणी, लॅवी पर्स, आणि दागिने*
*द्वितीय उपविजेती-देवयानी जोशी*
*५०००₹ रोख, पैठणी, लॅवी पर्स, आणि दागिने*
*उत्तेजनार्थ-मधुरा पत्की हरदास*
*पैठणीआणि दागिने*

ज्योती शिवलकर, हेमांगी जोशी ,शिल्पा नाईक,रचना जोशी व सारिका जोशी ,आकांक्षा वालेकर ,गीता सोहनी,शिवानी दिवाळे ,मानसी देशपांडे,सुनीती मोहरील, सुषमा देशपांडे, ,सुवर्णा आशिरगडे , शर्वरी गाडगे ,सरिता पुराडभट ,स्मिता देशमुख ,लीना लोटे ,स्मिता घिसाड.
ह्या सर्व ब्रह्मवादिनी सख्यांचे सहकार्य लाभले.आद्यब्रह्मवादिनी फाऊंडेशनच्या कार्यकारिणीतील सर्व सख्यांच्या उत्स्फूर्त सहकार्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला.