ज्याची संपूर्ण राज्याला उत्सुकता लागून राहिलेली होती त्या बहुप्रतिक्षित नागपूर- मुंबई द्रुतगती समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५२० किमी टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी होणार आहे. हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर १० तासांऐवजी ५ तासांत कापता येईल. यापूर्वी अनेकदा समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाच्या तारखा ठरुनही विविध कारणांमुळे लोकार्पण सोहळा लांबणीवर पडत होता. मात्र डिसेंबरच्या ११ तारखेचा मुहूर्त अंतिम झाला असल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली आहे.दरम्यान आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर विमान तळावर प्रसार माध्यमांशी संवाद साधला.पंतप्रधानांच्या दौऱ्याची तारीख निश्चित होताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, प्रशासनही सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नागपुरात दाखल झाले असून महामार्गाची पाहणी व आढावा घेणार आहेत. बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी मार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर निघाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी नागपुरात उद्घाटन होणार आहे. याचवेळी नागपूर मेट्रोच्या रिच-२ (कामठी मार्ग) व रिच-४ (सेंट्रल एव्हेन्यू) या मार्गांचेदेखील उद्घाटन होणार आहे
पंतप्रधानांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाचं लोकार्पण : फडणवीस
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा