Home Top News Vidarbha Climate विदर्भात पावसाची शक्यता

Vidarbha Climate विदर्भात पावसाची शक्यता

0

नागपूर NAGPUR  : भारतीय हवामान विभागाने विदर्भासह राज्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिलाय. पुढील चार ते पाच दिवसात विदर्भातील अनेक जिल्ह्यात पाऊस व वादळी वाऱ्यांची शक्यता असल्याचे हवामान विभागाने आपल्या अंदाजात नमूद केले आहे. शनिवारपासून विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये वातावरण बदलायला सुरुवात होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशाराही देण्यात आलाय. (Vidarbha Climate)
नोव्हेंबर महिना उलटून गेला असला तरी यंदा फारशी थंडी पडलेली नाही.

यंदा पावसाळ्यात पाऊसही अत्यल्प झाला. आता हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील चार ते पाच दिवसात विदर्भात ढगाळ वातावरण, पाऊस व काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात असे वातावरण राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याशिवाय राज्याच्या अनेक भागात पावसाचे संकेत आहेत. रविवारी उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागातही गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.