नागपूर – मुंबईचे ठाकरेद्वय सख्खे शेजारी

0

आमदार निवासातील व्यवस्था ; दोन माजी मुख्यमंत्र्यांनाही आमदार निवास


नागपूर. मुंबई व नागपूरचे दोन ठाकरे हिवाळी अधिवेशनानिमित्ताने एकमेकांच्या शेजारी मुक्कामाला असतील. राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray ) व काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे (Congress city president MLA Vikas Thackeray ) यांना आमदार निवासातील पहिल्या इमारतीतील अनुक्रमे 2 व 3 क्रमांकाची खोली देण्यात आली आहे. तर, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray ) यांनाही याच इमारतील चौथ्या माळयावरील 406 क्रमांकाची खोली देण्यात आली आहे. विशेष म्हणजे महिला आमदार व काही आमदार वगळता सहसा आमदार निवासातील अनेकांचा मुक्काम नसतो. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना खोली क्र,. 102, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना खोली क्र. 7, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांना 8, राष्ट्रवादीचे माजी मंत्री छगन भुजबळ यांना 6, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांना 4, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना 105, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना 101 तर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना 127 आणि माजी मंत्री नितीन राऊत यांना 15 नंबरची खोली देण्यात आली आहे. महिला आमदारांसाठी इमारत क्र. 1 मधील एका माळयावरील खोल्यादेण्यात आल्या आहेत.

देशपांडे सभागृहाचे छत बदलले
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देवगिरी बंगला चहुबाजुने सुरक्षीत करून 10फूट उंच संरक्षण भींत बांधण्यात आले आहे.बंगल्यात उत्कृष्ट असे सभागृहही तयार करण्यात आले आहे. रवीभवन अनेक वर्षानंतर चकाचक झाले आहे.160 खोल्यांचे गाळे येथे सोलर टॉप लावण्यात आला असून, वीजेची मोठी बचत होईल. अधिवेशन काळात देशपांडे सभागृहात सरकारी कार्यक्रमासाठी राखीव असतो. त्यामुळे देशपांडे सभागृहाचे छत बदलण्यात आले आहे. तर, सिलींगचे काम लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अभियंता रवीभवन तसेच आमदार निवासाचे अधिक्षक संजय उपाध्ये यांनी दिली.

असे आहेत मंत्र्यांचे कॉटेज :-

 • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- रामगिरी, रवीभवन कॉटेज क्र. 29,30 (कार्यालय)
  -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- देवगिरी तसेच रविभवन कॉटेज क्र. 5
  -राधाकृष्ण विखे पाटील-महसूल मंत्री – रविभवन, कॉटेज क्र. 1
  -सुधीर मुनगंटीवार-वनमंत्री – रवीभवन, कॉटेज क्र. 2
  -चंद्रकांत पाटील-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री- रवीभवन, कॉटेज क्र. 3
  -विजयकुमार गावीत, आदिवासी विकास मंत्री – रवीभवन, कॉटेज क्र. 4
  -गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री- रवीभवन, कॉटेज क्र. 7
  -रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री, रवीभवन, कॉटेज क्र.6
  -गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता, रवीभवन, कॉटेज क्र.
  -राहूल नावेंकर, विधानसभा अध्यक्ष,रवीभवन, कॉटेज क्र. 9
  -दादा भुसे, खनिकर्म मंत्री, रवीभवन, कॉटेज क्र. 10
  -संजय राठोड, अन्न व औषध मंत्री, रवीभवन, कॉटेज क्र. 11
 • सुरेश खाडे, कामगार मंत्री., रवीभवन, कॉटेज क्र. 12
  -सांदीपान भुमरे- रोहयो मंत्री, रवीभवन, कॉटेज क्र. 13
  -उदय सामंत, उद्योग मंत्री, रवीभवन, कॉटेज क्र. 26
  -तानाजी सावंत, आरोग्य मंत्री, रवीभवन, कॉटेज क्र.15
  -अब्दुल सत्तार, कृषी मंत्री, रवीभवन कॉंटेज क्र. 16
  -दीपक केसरकर, पर्यटन मंत्री, रवीभवन कॉटेज क्र. 17
 • डॉ. निलम गोऱ्हे, उपसभापती, विधानपरिषद, रवीभवन, कॉटेज क्र. 20
  -नरहरी झिरवाळ, उपाध्यक्ष, विधानसभा, रवीभवन कॉटेज क्र. 19
 • अजीत पवार, विरोधी पक्षनेता, विधानसभा, रवीभवन, कॉटेज क्र. 23
 • अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद, रवीभवन, कॉटेज क्र. 22
  -अतुल सावे, बहुजन कल्याण मंत्री, रवीभवन कॉटेज क्र.21
  -शंभुराज देसाई, उत्पादन शुल्क मंत्री, रवीभवन, कॉटेज क्र.
  -मंगलप्रभात लोढा, महिला व बाकल्याण मंत्री, रवीभवन कॉटेज क्र. 25
  -रवीभवन, कॉटेज क्र. 27, 28…रिक्त
    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा