भाजपच्या भटके विमुक्त आघाडीचे राज्यव्यापी अधिवेशन २२ ला नागपुरात

0

नागपूरः भारतीय जनता पार्टीच्या भटके विमुक्त आघाडीचे राज्यव्यापी (BJP State Nomadic Tribes Cell Convention in Nagpur) अधिवेशन दिनांक २२ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत नागपुरात आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, केंद्रीय राज्य मंत्री डॉ भगवत कराड, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, राष्ट्रीय ओबोसी आयोग अध्यक्ष हंसराज अहिर, मंत्री अतुल सावे, खा डॉ विकास महात्मे, खासदार प्रीतम मुंडे, आमदार श्रीकांत भारतीय, भिकुजी दादा विधाते, विश्वास पाठक, मा. अतुल वझे, रामेश्वर नाईक उपस्थित राहून भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या अधिवेशनात भटके विमुक्तांच्या विविध प्रश्नावर विचार विनिमय होणार आहे. युती शासनाच्या व केंद्र शासनाच्या धोरणांची व विविध योजनांची माहिती भटक्या विमुक्तांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना व समाजाला मिळावी. तसेच भारतीय जनता पार्टीचे काम भटक्या विमुक्त समाजात वाढावे, यासाठी भटक्या विमुक्तांचे राज्यव्यापी अधिवेशन आयोजित केले आहे. या अधिवेशनात भटके विमुक्त आघाडीचे संपूर्ण राज्यातून महिला, युवक, युवती मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा