NMC Nagpur : नागपूर मनपा ‘या’ पुरस्काराने सन्मानित

0

नागपूर (Nagpur)ता १९: नागपूर महानगरपालिकेला केंद्र सरकारचा “DAY-NULM  अंतर्गत उत्कृष्ट कार्य- द्वितीय पुरस्कार”प्राप्त झाला असून, नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री श्री. मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. शुक्रवारी (ता: १९) मनपा मुख्यालयातील आयुक्त सभा कक्षात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात मनपाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांना हा पुरस्कार सुपूर्द केला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त यादीत महानगरपालिका दहा लाख लोकसंखेच्या मोठ्या महानगरपलिका गटात देशात द्वितीय स्थानी आहे.(“Systematic Progressive Analytical Real Time Ranking” Award)

नवी दिल्ली येथील स्टीन ऑडिटोरियम, इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे आयोजित ‘उत्कृष्टता की और बढते कदम’ कार्यक्रमात केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री श्री. मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते नागपूर महानगरपालिकेला ‘सिस्टमॅटिक प्रोग्रेसिव्ह ॲनालिटिकल रिअल टाइम रँकिंग’ (SPARK-2023-24) पुरस्काराने गौरविण्यात आले. मनपाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे तसेच शहर व्यवस्थापक श्री. प्रमोद खोब्रागडे, श्री. विनय त्रीकोलवार, श्रीमती नूतन मोरे, श्री. रितेश बांते यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे मा. सचिव श्री. अनुराग जैन दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी उपजीविका व पीएम स्वनिधीचे सहसचिव श्री.राहुल कपूर व केंद्रीय गृह निर्माण व शहरी राज्य मंत्री श्री. तोखन शाहू, नगर परिषद प्रशासन संचनालय, मुंबई संचालक श्री. मनोज रानडे, नगर विकास विभागाचे उपसचिव श्रीमती सुशीला पवार, सह आयुक्त श्री. शंकर गोरे उपस्थित होते. (NMC Nagpur)

पं. दीनदयाल अंत्योदय योजना (Deendayal Antyodaya Yojana)राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नागपूर शहरात वर्ष 2014 सुरू असून, सदर  योजनेत सामजिक अभिसरण व संस्थात्मक मध्ये एकूण 2510 बचत गट तयार करण्यात आले. यात एकूण 2008 बचत गटांना कर्ज उपलब्ध करून दिले, तर 2235 लाभार्थ्यांना वैयक्तिक व्यवसायाकरिता बँक मार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. 10987 लाभार्थ्यांना  प्रशिक्षण देण्यात आले. शहरात 250 क्षमता असलेले एकूण 5 शहरी बेघराना निवारा कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच शहरी पथविक्रेत्यांना अर्थसहाय्य अंतर्गत पथ विक्रेते करीता शासन निर्णय नुसार महाराष्ट्र सर्वप्रथम मतदान पद्धतीने पथविक्रेता समिती स्थापन करण्यात आली. तसेच पीएमस्वनिधी योजने अंतर्गत महानगरपालिकेला 48,113 उद्दिष्टे प्राप्त होते, या अनुषंगाने 59,330 (123टक्के) लाभार्थ्यांना प्रथम कर्ज उपलब्ध करून दिले, तर 1110 लाभार्थ्यांना द्वितीय तर 2323 लाभार्थ्यांना तृतीय कर्ज बँक मार्फत उपलब्ध करून देण्यात आले आहे. सदर उपांग अभियान संनियंत्रण व मूल्यांकन प्रणाली (उपंग) मध्ये उत्कृष्ट कार्या विषयी रिअल टाइम रँकिंग नुसार भारततील DAY-NULM कार्यरत (million plus cities) मध्ये नागपूरने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

केंद्रीय ग्रहनिर्माण व शहरी मंत्रालयाच्या दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत 2023-24 वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या देशातील 33 महानगर पालिका व नगरपालिकामधून नागपूर महानगरपालिकेला “उत्कृष्ट कार्य- द्वितीय पुरस्कार” प्राप्त झाला आहे.

नागपूर महानगरपालिकेला पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी मनपाच्या दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान अंतर्गत शहर व्यवस्थापक व समूह संघटक यांना चमूचे अभिनंदन केले आहे.

 

NMC Nagpur property tax receipt
NMC Nagpur property tax
Nagpur Municipal Corporation Zone list
NMC Nagpur Complaint
Nagpur Municipal Corporation tax
GeoCivic property tax Nagpur
NMC property tax Nagpur online
Nagpur Municipal Corporation water bill
Deendayal antyodaya yojana in marathi
Deendayal antyodaya yojana wikipedia
Deendayal Antyodaya Yojana launch date
Deendayal Antyodaya Yojana UPSC
Deendayal Antyodaya Yojana Online application
Deendayal Antyodaya Yojana in Hindi
Deendayal Antyodaya Yojana under which Ministry
Deendayal Antyodaya Yojana – National Rural Livelihood Mission