
नागपूर : विश्वमोहिनी अनसूया माता (पारडसिंगा निवासिनी) यांचा जन्मदिवस शुक्रवार दिनांक ५ मे रोजी साजरा केला जाणार आहे. डिगडोह हिंगणा येथील शांती विद्या भवनच्या प्रांगणात ९६ व्या जन्मदिनानिमित्त आयोजित सोहळ्यात माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, गिरीश चंद्रशेखर वऱ्हाडपांडे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहीरकर आणि बजरंगसिंह परिहार, महिला आयोग सदस्या आभा पांडे, माजी आमदार विजय घोडमारे, माजी निगम सचिव हरीष दुबे आदी मान्यवर उपस्थित राहतील अशी माहिती संयोजक दिलीप पणकुले यांनी दिली. पनकुले परिवाराच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमात राजाभाऊ चिटणीस, प्रभाकरराव देशमुख, सरपंच सौ. इंद्रायणी काळबांडे, उपसरपंच मा. कैलासजी गिरी, सभापती उमेश सिंह राजपूत, हर्षलता गौतम मेश्राम, मंगलाताई रडके, जि. प. सदस्या सौ. रश्मी कोटगुले, सुभाष वऱ्हाडे, डॉ. रमेश पाटील, गणेश धानोरकर यांच्या उपस्थितीत अनसूया माता मंदिर, शांती विद्या भवन परिसर, डिगडोह (देवी) हिंगणा रोड, नागपूर येथील शाळेच्या प्रांगणात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
सकाळी 11 वाजता छप्पनभोग व नैवद्य दुपारी १ वाजता वेदाचार्य आचार्य विवेक त्रिपाठी व रामजी त्रिपाठी यांचे विविध धार्मिक कार्यक्रम दुपारी ४ ते ६ जय दुर्गा भजन मंडळ, डिगडोह व ६ ते ७. ३० संगीतमय सुंदरकांड (वेदाचार्य विवेक त्रिपाठी) आयोजित दत्ता गणोरकर अनसूया भजन मंडळाचे भजन होईल. सायंकाळी ७. ३० वाजता महाआरती, गोपालकाला व महाप्रसाद वितरण करण्यात येईल. कार्यक्रमासाठी प्राची प्रवीण ढोले, सौ. वैशाली रोहित उपाध्ये, सौ. अनुराधा अनंत खोकले, सौ. सूचिता बाराहते, पी. एस. चौबे, सोपानराव शिरसाट, वसंतराव घटाटे, राजेंद्र आसलकर, तात्यासाहेब मते, एस. के. सिंह, राहुल पांडे, विजय कोटगुले, अभिजित शेंडे, नितीन रडके, योगेश मोहुर्ले, दीपक रडके, फैजल शेख, भीम तिवारी, अंकित कोल्हे, अनिता फ्रान्सिस, ममता ढोरे, अनिल यावलकर, अजय धोटे, संजय शेवाळे, सौ. श्रृती सुधीर मुलमुले, सरदार रवींद्र मुल्ला, प्रमोद वानकर, बबलू चौहान, देविदास अडांगळे, गजानन मुळे आदि भक्तगण सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.