ब्रह्मलीन संत श्री धनराज गिरी महाराज पुण्यतिथी समारोह 14 पासून, 15 रोजी कुस्ती स्पर्धा

0

नागपूर : श्री संकटमोचन पंचमुखी हनुमान टेकडी देवस्थान बेलोरी खुर्द बाबुळखेडा तहसील सावनेर जिल्हा नागपूर येथे ब्रह्मलीन संत श्री धनराज गिरी महाराज पुण्यतिथी समारोह गुरुवार दिनांक 15 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. बुधवार दिनांक 14 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता भजन संध्या तर गुरुवार दिनांक 15 डिसेंबरला सकाळी 7 वाजता समाधी पूजन, सकाळी 8 वाजता गायत्री महायज्ञ , दुपारी 12 ते 2 गोपालकाल्याचे कीर्तन ह भ प प्रभाकर महाराज भुसारी ब्रह्मपुरी व संच यांचे कीर्तन व महाकाला तसेच दुपारी 2 पासून महाप्रसाद होणार आहे. याप्रसंगी पुरुषांची भव्य इनामी कुस्ती स्पर्धा होणार आहे. पाटनसावंगीपासून 2 किलोमीटर अंतरावर तसेच कोराडी तलाव नांदा फाटा ते नांदा फाटा ते लोणखेरी मार्गावर हे तीर्थक्षेत्र आहे. याप्रसंगी खासदार कृपाल तुमाने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ,आमदार टेकचंद सावरकर, माजी मंत्री सुनील केदार आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.