Nagpur Winter Session-2023 विरोधक चहापानावर बहिष्कार घालण्याची शक्यता

0

नागपूर NAGPUR – उद्या गुरुवारपासून नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होत असून आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधक बहिष्कार घालतील, असे संकेत मिळत आहेत. दुपारी सर्व विरोधी पक्षांची बैठक विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार  Vijay Vadettiwar यांच्या निवासस्थानी होत असून त्यात या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (Nagpur Winter Session-2023)

अधिवशनाच्या निमित्ताने राज्य मंत्रिमंडळासह विरोधी पक्षांतील नेत्याचे नागपुरात आगमन झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार  Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Minister Ajit Pawar हे दुपारनंतर नागपुरात दाखल होतील. सायंकाळी ५ वाजता विरोधकांसह चहापानानंतर सायंकाळी साडेपाच वाजता राज्यमंत्रिमंडळाची बैठक आहे. सत्तापक्षाच्या चहापानावर विरोधक बहिष्कार घालण्याच्या तयारीत आहेत. तसेच संकेतही विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून मिळाले आहेत. विशेषतः राज्यातील अवकाळी पाऊस व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक भूमिका घेतील, असे दिसते. त्याचप्रमाणे मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणात मराठ्यांना सामावून घेण्यास होत असलेला विरोध अशा अनेक मुद्यांवर विरोधक सत्तापक्षाशी संघर्षाच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे अलिकडेच देशातील तीन राज्यांमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे भाजपसह मित्र पक्ष अधिवेशनाच्या बाबतीत निर्धास्त दिसत आहेत.