“फक्त १० दिवस होणाऱ्या अधिवेशनात स्वागत..”, शरद पवार गटाची बॅनरबाजी

0

नागपूर NAGPUR -राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून नागपुरात सुरुवात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपराजधानी नागपुरातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार  Sharad Pawar गटाकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवड्याचे व्हावे, अशी विरोधकांची मागणी असताना ते केवळ दहा दिवस चालणार असल्याचे नमूद करीत पवार गटाने सत्ताधार्यांच्या विरोधात शहरात बॅनरबाजी सुरु केली आहे. “फक्त १० दिवस होणाऱ्या अधिवेशनात स्वागत..”, या स्वरुपाचे बॅनर्स शरद पवार गटाकडून झळकविले जात आहेत. (Nagpur Winter Session-2023)

राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता शरद पवार अधिक आक्रमक होण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याची छलक आता शरद पवारच्या बॅनरबाजीतून बघायला मिळत आहे. नागपूर विमानतळाजवळ तसेच सिव्हील लाईन्स परिसरात शरद पवार गटाकडून असे बॅनर झळकत आहेत.