औरंगजेबाचे उदात्तीकरण अशोभनीय..”, संभाजीराजे छत्रपतींची टीका

0

नाशिक Nashik – “छत्रपती शिवाजी महाराजांचा ““Chhatrapati Shivaji Maharaj त्रास देणाऱ्या व संभाजी राजांची हत्‍या केलेल्‍या औरंगजेबाचे उदात्तीकरण अशोभनीय आहे. जे लोक औरंगजेबाचे उदात्तीकरण करत आहेत, त्‍यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही”, अशा शब्‍दात स्‍वराज्‍य पक्षाचे प्रमुख Former MP Sambhaji Raje Chhatrapati माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संबंधितांना खडसावले. महाराष्ट्राला राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर Rajarshi Shahu Maharaj, Dr. Babasaheb Ambedkar या थोर पुरुषांसह महाराष्ट्राला मोठी संतपरंपरा लाभलेली असताना औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे अशोभनीयच आहे, असे ते म्हणाले.

 

अलिकडेच औरंगजेबाच्या फोटोचे स्टेटस ठेवण्यावरून तणाव निर्माण झाला होता. तर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट घेऊन माथा टेकविला होता. या साऱ्या पार्श्वभूमीवर स्‍वराज्‍य पक्षाचे प्रमुख व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सध्या राज्‍यातील राजकारणाची पातळी खालावली असल्‍याची टीका केली. आज छत्रपती शिवाजी महाराज, महात्‍मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या विचारांची समाजाला खरी गरज आहे. परंतु या थोर पुरुषांचे आचार-विचार दुर्लक्षित झाल्याची खंत वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्‍यांनी त्रास दिला, संभाजी महाराजांची ज्‍याने हत्या केली, महाराणी ताराराणी यांना ज्‍याच्‍या विरोधात संघर्ष करावा लागला, अशा औरंगजेबाचे उदात्तीकरण महाराष्ट्रातील भूमीत तरी व्‍हायला नको. जर ते होत असेल, तर हा आपला महाराष्ट्र असूच शकत नाही, असेही ते म्हणाले.