१९ वर्षांनंतर येणार ‘नवरा माझा नवसाचा २’!

0

 

मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ व दिग्गज (Actor Sachin Pilgaonkar) अभिनेते सचिन पिळगावकर यांचा ‘नवरा माझा नवसाचा’ हा एव्हरग्रीन चित्रपट २००४ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने जवळपास दोन दशकं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आजही या चित्रपटातील प्रत्येक संवाद व गाणी प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. अशातच आता सचिन पिळगावकरांनी ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

तब्बल १९ वर्षांनी निर्माते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. पहिल्या चित्रपटात आपल्याला गणपती पुळेच्या सहलीची मजेशीर गोष्ट पाहायला मिळाली आणि शेवटी बाप्पाचं दर्शन घडलं. आता नव्या भागात नवस फेडायला वॅकी नेमका कुठे जाणार? यामध्ये कोणकोणते ट्विस्ट असतील याचा उलगडा थेट चित्रपटगृहात होणार आहे. परंतु, तत्पूर्वी या चित्रपटातील तगड्या स्टारकास्टची नावं समोर आली आहेत.

चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक तसेच प्रमुख अभिनेते सचिन पिळगावकर यांनी यासंदर्भात पोस्ट शेअर करून चित्रपटाची स्टारकास्ट जाहीर केली आहे. यामध्ये (Veteran actor Ashok Saraf)ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, (Supriya Pilgaonkar) सुप्रिया पिळगावकर, (Swapnil Joshi)स्वप्नील जोशी, (Hemel Ingle)हेमल इंगळे, अलीसागर, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार अशी दिग्गज कलाकारांची फौज असणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे.