नेहल काळेची ९५टक्क्यांसह उंच भरारी

0

सीबीएससी परीक्षेचा निकाल जाहीर

मेडिकल फिल्ड मध्ये करणार करिअर – नेहल काळे

डॉक्टर काळे दाम्पत्यांच्या स्वप्नांना नेहल ने दिला उजाळा

नागपूर (Nagpur) –— केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत झालेल्या २०२४ च्या दहावी व बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या दोन्ही परीक्षांमध्ये नागपूरच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली आहे. काही शाळांनी १०० टक्के तर अनेक शाळांनी ९० टक्क्यांच्यावर यश प्राप्त केले. शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत नाव नोंदविण्यात यशस्वी ठरले. शहरातील जवळपास ६० च्यावर शाळांमध्ये दहावीचे ७ ते ८ हजार विद्यार्थी, तर २० च्यावर शाळांमध्ये बारावी बोर्डाचे अडीच ते तीन हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये सर्व शाळांमधील ९० टक्के विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी केली.

दिघोरी निवासी नेहल काळे यांनी देखील सिबीएससी दहाच्या वर्गाच्या परीक्षेत अतुलनीय यश संपादन केले आहे , या परीक्षेत ९५ टक्के गुण सम्पादन करून त्यांनी आपले शिक्षक आणि आप्तजनांचा मान वाढविला आहे , मला ९८ टक्के मिळणार असल्याची खात्री होती मात्र ९५ टक्के मिळाल्यावर देखील मी खूप समाधानी असल्याची प्रतिक्रिया नेहल काळे ने दिली , नेहल नागपूर चे सुप्रसिद्ध काळे पाइल्स हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर वीरेंद्र काळे आणि डॉक्टर लता काळे यांचा मुलगा असून दहाव्या वर्गाच्या परीक्षेत त्याने सम्पादन केलेल्या यशामुळे त्याच्या आप्तजनांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण संचारले आहे , आम्ही नेहल ला अभ्यासासाठी कधीही दडपण आणले नाही किंवा त्याला उगाचच आभासासाठी प्रचंड ताण देण्याचा प्रयत्न केला नाही , आम्हाला नेहल च्या जिद्दीवर आणि त्याच्या मेहनतीवर पूर्ण विश्वासअसल्याची प्रतिक्रिया त्याच्या आप्तजनांनी दिली , नेहल ने भविष्यात मेडिकल फिल्ड मध्ये करिअर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे , डॉक्टर वीरेंद्र काळे यांना त्यांचा मुलगा कदाचित इंजिनिअरिंग मध्ये करिअर करेल असं वाटत होत मात्र त्याच्या मेडिकल फिल्ड मध्ये जाण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे , विद्यार्थ्यांवर स्वतःचे निर्णय ल लादता त्यांना त्यांचे करिअर त्यांचे भविष्य स्वतः निवडू देण्याचा सल्ला देखील त्यांनी या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या पालकांना दिला आहे ,

सनी भोंगाडे
नागपूर प्रतिनिधी