Nitin Gadkari : विदर्भातील आमदार आणि मंत्र्यांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार

0

महाराष्ट्र (Maharashtra) : विधानसभा निवडणूक जाहीर झाली. लोकसभेतील अपयश पुसून काढायचे होते. ज्येष्ठ नेत्यांच्या आशीर्वादाने आम्ही सगळे मैदानात उतरलो. त्यावेळी नितीनजींनी अख्खी निवडणूक अंगावर घेतली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सभा घेऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. प्रचाराला दिशा देण्याचे काम केले. आता विजयामुळे आपली जबाबदारी वाढली आहे. आमचे वरिष्ठ नेते हिमालयासारखे आमच्या पाठिशी उभे आहेत. त्यांच्या आणि जनतेच्या अपेक्षांना खरे उतरू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मंत्री, आमदारांचा सत्कार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, कामगार मंत्री आकाश फुंडकर, गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांच्यासह रणधीर सावरकर, चैनसुख संचेती, संजय कुटे, श्याम खोडे, सईताई डहाके, प्रताप अडसड, राजेश वानखेडे, केवलराम काळे, प्रवीण तायडे, उमेश यावलकर, राजू तोडसाम, सुमित वानखेडे, राजेश बकाणे, समीर कुणावार, देवराव भोंगळे, किशोर जोरगेवार, बंटी भांगडिया, मिलिंद नरोटे, विजय रहांगडाले, संजय पुराम, मोहन मते, कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, चरणसिंग ठाकूर, आशीष देशमुख, समीर मेघे यांच्यासह विदर्भातील आमदारांचा ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांचाही सत्कार करण्यात आला.