नवरात्र निमित्त झेंडू, शेवंती फुलांना वाढली मागणी

0

नागपूर NAGPUR  – आजपासून आश्विन  NAVRATRI 2023 नवरात्र महोत्सव सुरू होत असल्याने झेंडूच्या फुलांची मागणी नागरिकांकडून वाढली आहे. बाजारात झेंडूच्या फुलांची हात विक्री 70 ते 80 रुपये किलोने होताना दिसत आहे विक्रेत्यांना 50 ते 55 रुपये किलोने लिलावातून मिळत असल्याने फुल विक्रेते नागरिकांना 70 ते 80 रुपये किलोने विक्री करत आहेत. यासोबतच ठिकठिकाणी झेंडूचे फुलांचे विक्रेते बसलेले दिसत आहेत. दसरा, दिवाळीला झेंडू, शेवंती आणि गुलाबाला चांगला भाव मिळत असल्याने रोखीचे पीक म्हणून भाजीपाला उत्पादनासोबतच आता फुल उत्पादनातही शेतकरी लक्ष घालत आहेत.