संसदेच्या गेट बाहेर फलक उंचावत वेधले सरकारचे लक्ष
opposition protest Against GST on insurance नवी दिल्ली (New Delhi,), 06 ऑगस्ट केंद्र सरकार आयुर्विमा आणि आरोग्य विम्याच्या हप्त्यावर 18 टक्के जीएसटी लावते. हा जीएसटी मागे घ्यावा अशी मागणी विरोधकांनी केलीय. त्यासाठी आज, मंगळवारी संसदेच्या गेटसमोर विरोधकांनी फलक उंचावत घोषणाबाजी केली.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari)यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांना पत्र पाठवून आयुर्विमा आणि आरोग्य विम्यावरील 18 टक्के जीएसटी मागे घेण्याची सूचना केली होती. त्यानंतर इंडी आघाडीच्या खासदारांनी जीएसटी मागे घेण्याची मागणी केली आहे. यासाठी विरोधी पक्षांनी संसदेबाहेर आंदोलन केले. खासदार शरद पवार (MP Sharad Pawar), काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Congress leader and Leader of Opposition in Lok Sabha Rahul Gandhi)हेही या आंदोलनात सहभागी झाले होते. भाजप सरकारच्या असंवेदनशील विचारसरणीचा हा पुरावा असल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले.
आरोग्य विम्यावर जीएसटी लावल्याने विरोधकांनी सरकारला घेरले आहे. मोदी सरकारने जीएसटीच्या माध्यमातून आरोग्य विम्यावरील हप्त्यातून सर्वसामान्य नागरिकांकडून 24 हजार कोटी वसूल केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. राहुल गांधी यांनी ट्वीटरवर (एक्स) यासंदर्भात एक पोस्ट लिहून सरकारवर टीका केली आहे. आपल्या संदेशात राहुल गांधी म्हणाले की, एखाद्याच्या आयुष्यात येणाऱ्या आरोग्य संकटासमोर कुणालाही झुकावे लागू नये, यासाठी प्रत्येक जण पैसा जोडून दरवर्षी आरोग्य विमा प्रीमियम भरणाऱ्या कोट्यवधी सामान्य भारतीयांकडून केंद्र सरकारने 24 हजार कोटी गोळा केले. प्रत्येक आपत्तीपूर्वी कर गोळा करण्याची संधी शोधणे हा केंद्र सरकारच्या असंवेदनशील विचारसरणीचा पुरावा आहे. इंडी आघाडी या संधिसाधू विचारसरणीला विरोध करते. आरोग्य आणि जीवन विमा जीएसटी मुक्त करणे आवश्यक असल्याचे राहुल गांधी यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.
काँग्रेसचे खासदार जेबी माथेर सरकारवर टीका करताना म्हणाले की, आरोग्य आणि जीवन विम्यावर जीएसटी लावू नये. सरकारचा हा निर्णय मानवी श्रद्धेचा आदर दाखवत नाही. आता केंद्र सरकारने विम्यावर 18 टक्के जीएसटी लावला आहे, जो गरीब लोक दिलासा म्हणून घेतात. सरकारच्या या निर्णयामुळे हेच दिसून येते की मानवी श्रद्धेचा आदर नाही. आम्ही एकत्र आहोत आणि जीएसटी मागे घेण्याची मागणी करत असल्याचे जेबी माथेर यांनी सांगितले.