पूर्व नागपुरातील लकडगन्ज स्थित पक्वाश शाळेला ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत , त्यामुळे शाळेच्या समितीमार्फत भव्य अमृत महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे , दिनांक ७ आणि ८ जानेवारी ला या अमृत महोत्सवाचे आयोजन केले जाणार असून देश विदेशात पोहोचलेले शाळेतील जुने विद्यार्थी या आयोजनात सामील राहणार आहेत , मागील ७५ वर्षांपासून शाळेतुन निघालेल्या विद्यार्थ्यांनी मोठमोठी पदे भूषवून शाळेचं नाव मोठं केलं आहे , पूर्व नागपुरात स्थापन झालेली ही शाळा विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी पालकांची पहिली पसंती आहे. पदाधिकाऱ्यांचे अविरत परिश्रम, समर्पण आणि कार्यकुशलता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कार्य आणि मुख्याध्यापकांचे कार्यक्षम नेतृत्व यामुळे शाळेने आपला 75 वर्षांचा सुवर्ण प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे. याचेच अवचित्य साधून 7 आणि 8 जानेवारी 2023 रोजी अमृत महोत्सव साजरा करणार आहे