परळीः भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाच्या पथकाने छापा घातला (BJP Leader Pankaja Munde) आहे. गुरुवारी सकाळपासूनच जीएसटीचे अधिकारी या कारखान्यात दाखल होऊन आर्थिक व्यवहारांची चौकशी करीत (GST raid on Vaijnath Sugar Factory) आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ माजली आहे. केंद्र सरकारचा जीएसटी कर थकविल्याप्रकरणी ही चौकशी सुरु असल्याची प्राथमिक माहिती आहे. पंकजा मुंडे या सध्या पक्ष व नेत्यांवर नाराज आहेत. त्यामुळे या कारवाईचा संबंध त्याच्याची लावला जातोय. दरम्यान, कारखान्यावरील कारवाईची माहिती माझ्या आधी प्रसार माध्यमांना कशी मिळाली, असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी यासंदर्भात बोलताना उपस्थित केला आहे. अधिकाऱ्यांना हवी ती सारी कागदपत्रे देण्यात आली असून कारखाना आर्थिक संकटात असल्याने सध्या बंदच आहे, असे त्या म्हणाल्या.
गुरुवारी सकाळीच जीएसटीचे अधिकारी कारखान्यात दाखल झाले. त्यांनी कारखान्याचे रेकॉर्ड तपासणे सुरु केले. (gst )जीएसटी थकविल्याच्या प्रकरणी ही कारवाई सुरु असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्याला जीएसटी विभागाकडून कुठलाही दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, या कारवाईनंतर (PANKAJA MUNDE)पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. राजकीय वर्तुळात या कारवाईची मोठी चर्चा आहे