‘वसंतोत्‍सव’ कविसंमेलन 14 एप्र‍िल रोजी

0

नागपूर, 11 एप्रिल 2023 राम गणेश गडकरी स्मृती प्रतिष्ठान व (Vidarbha Gaurav Pratishthan)विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वसंतोत्सव’ कविसंमेलनाचे आयोजन शुक्रवार, 14 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह, शंकरनगर येथे करण्‍यात आले आहे. कार्यक्रमाला विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे डॉ. गिरीश गांधी आणि (RAM GANESH GADKARI)राम गणेश गडकरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजितबाबू देशमुख यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

अमरावतीचे प्रस‍िद्ध कवी पवन नालट, राजुराचे किशोर कवठे, दर्यापूरचे संघमित्रा खंडारे, चंद्रपूरच्या माधवी भट व पद्मरेखा धनकर आणि सावनेरचे गणेश भाकरे या कविसंमेलनात सहभागी होतील. या कार्यक्रमाला सर्वांनी अवश्य उपस्थित रहावे, असे आवाहन विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि राम गणेश गडकरी स्मृती प्रतिष्ठानने केले आहे.

ग्वावा ज्यूस आणि ड्रायफ्रूट मिल्क स्मूदी |Guava juice recipe |Dry Fruit Milk Smoothie Recipe|Ep- 110