महामंडळाकडून ऐन दिवाळीत प्रवाशांना फटका

0

 

नागपूर NAGPUR  : दिवाळीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही ST MAHAMANDAL  एसटी महामंडळाने १० टक्के भाडेवाढीचा निर्णय घेतला. ही दरवाढ दि.8 नोव्हेंबरपासून लागू होणार असून ती दि. २७ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.

त्यानंतर आता त्यामध्ये आणखी एका दरवाढीची भर पडली आहे. एसटी महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाने ऐन दिवाळीच्या गर्दी हंगामात १० टक्के भाडेवाढ केली आहे.त्यामुळे आता साध्या बससह शिवशाहीने जाण्यासाठी प्रवाशांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ साधी, जलद, निमआराम, साधी शयन आसनी, वातानुकूलित शिवाई, शिवशाही या बससाठी करण्यात आली आहे. दरम्यान, या दरवाढीतून शिवनेरीला वगळण्यात आले असून, या बसला पूर्वीचेच दर राहणार आहेत.या 10 टक्के भाडेवाढ मुळे प्रवाशांचे दिवाळे निघणार आहे.

विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक

अमरावती – एसटी कष्टकरी जनसंघाच्या वतीने अमरावतीच्या एसटी महामंडळाच्या काही कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत संप पुकारला आहे.
आरटीओच्या नियमानुसार वाहन चालकांना गाड्या देण्यात याव्या याबद्दलची नोटीस महामंडळाला देण्यात आली होती. अमरावती विभागात ज्या गाड्या चांगल्या स्थितीत आहेत, त्याच गाड्या नेण्याचा निर्धार चालकांनी, वाहकांनी केला आहे. ज्या गाड्यांची कामे झाले नाहीत, ज्या गाड्या कार्यरत नाहीत अशा गाड्या नेणार नाहीत, अशी माहिती एसटी कष्टकरी जनसंघाचे विभागीय अध्यक्ष धीरज तिवारी यांनी दिली. आमच्या विविध मागण्यांचा विचार महामंडळाने करावा अशी विनंती करण्यात आली आहे.