पटोलेंनी गिधाडांच्या वृत्तीनं वागू नये- बावनकुळे यांचा इशारा

0

 

 

नागपूर(Nagpur) :अकोल्याचे (of Akola) खासदार संजय धोत्रे यांच्याबद्दल काँग्रेसचे(of Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं निंदनीय वक्तव्य आहे.
नाना पटोलेंनी घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण चींतू नये,असा इशारा भाजप (bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
अकोल्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी असंवेदनशील वक्तव्य केल्याने भाजपने त्यांना लक्ष्य केले आहे. आमचे ज्येष्ठ नेते आणि अकोल्याचे लोकप्रिय खासदार संजय धोत्रे यांना दीर्घायुष्य लाभो. त्यासाठी आम्ही सर्वजण रोज प्रार्थना करीत असतो. पण त्यांच्याबद्दल असे अभद्र बोलून तुम्ही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांच्या, अकोला मतरसंघातील मतदारांच्या मनाला वेदना पोहोचविल्या आहेत. तुम्हाला ही जनता माफ करणार नाही.
नाना, कावळ्याच्या श्रापानं गाय मरत नसते. तुम्ही भाजपविरोधात हवा तेवढा खोटा प्रचार करा, लोकांची मते मिळविण्यासाठी कुणासमोरही पायघड्या घाला. पण
कुणाच्या मरणाची वाट बघत त्यावर पोट भरणं ही गिधाडांची वृत्ती असते. आणि केवळ मते मिळविण्यासाठी तुम्ही गिधाडांच्या वृत्तीनं वागू नका असेही बजावले.
फडणवीस यांचेही टीकास्त्र
दरम्यान,काँग्रेस पक्ष (Congress party) एकिकडे दिल्लीत ‘न्यायपत्र’ जाहीर करतो आणि दुसरीकडे त्यांचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भर सभेत एका खासदाराच्या ‘मृत्यूची कामना’ करतात? असंवेदनशीलतेचा हा कहर आहे.निवडणुकीत आपण विरोधक असलो तरी विरोधकांच्या मृत्यूची कामना, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.
महाराष्ट्र आणि अकोल्यातील जनतेची तत्काळ माफी मागा !खा. संजय धोत्रे जी यांना दीर्घायुष्य लाभावे, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.